अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्रा यांनी एकत्र अनेक सिनेमांमध्ये काम केलं. सध्या दोघेही आपापल्या करिअरमध्ये व्यस्त आहेत. प्रियंका सध्या इंटरनॅशनल स्टार झालीय. तर अक्षय कुमार सुद्धा बॉलिवूडमध्ये विविध सिनेमात काम करतोय. अक्षय - प्रियंका यांचे 'अंदाज', 'ऐतराज', 'वक्त' आणि 'मुझसे शादी करोगी' अशा सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलंय. परंतु हे चार सिनेमे लोकप्रिय होऊनही अक्षय - प्रियंका यांनी कधी एकत्र काम केलं नाही. काय आहे यामागचे कारण?
म्हणून प्रियंकाने अक्षयसोबत केलं नाही काम?
सध्या प्रियंका चोप्राचा जुना इंटरव्ह्यू व्हायरल झालाय. या मुलाखतीत कोएल पुरी प्रियंकाला अक्षयसोबत पुन्हा एकत्र काम का केलं नाही असा प्रश्न विचारते. त्यावर प्रियंका म्हणाली, "यामुळे गोष्टी सोप्या होतात. एखाद्या चांगल्या नात्यात मला दरी निर्माण करायची इच्छा नाही." याशिवाय डायरेक्टर-निर्माते सुनील दर्शन यांनी एकदा खुलासा केलेला की, "बरसात सिनेमात अक्षय-प्रियंका एकत्र काम करणार होते. परंतु काही दिवसांपूर्वी अक्षयने सिनेमा सोडला नंतर बॉबी देओलला सिनेमात कास्ट करण्यात आलं."
ट्विंकलने घर सोडलं होतं कारण
त्यादरमान अक्षय - प्रियंकाच्या अफवाच्या चर्चा बॉलिवूडमध्ये सुरु होत्या. त्यामुळे अक्षय आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्नाच्या नात्यात मतभेद निर्माण झाले होते. ट्विंकलने घरही सोडलं होतं. त्यामुळे अक्षयने प्रियंकापासून अंतर ठेऊन पुन्हा तिच्यासोबत काम केलं नाही. प्रियंकानेही अक्षय कुमारसोबत नंतर कोणत्याच सिनेमाची ऑफर स्वीकारली नाही. अशाप्रकारे प्रियंका-अक्षयने सुपरहिट सिनेमे देऊनही एकमेकांच्या नात्याचा आदर ठेवत पुन्हा कधी एकत्र काम केलं नाही.