बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच दीपिका पादुकोण (Deepika padukone)चं नाव टॉप अभिनेत्रींच्या यादीमध्ये सामील आहे. त्याच्यासारखं आपलं ही आयुष्य असावं अशी इच्छा तिच्या लाखो फॅन्सची आहे. पण एक व्यक्ती अशी ही आहे जिला दीपिकाची दया येते. ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार(Akshay Kumar) आहे.
अक्षय कुमारने आपल्या एका मुलाखतीत दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्यातील नात्याबद्दल बोलला होता. यावेळी तो म्हणाला होता की, दीपिका पादुकोणची मला दया येते आणि ती तिला सलामही करतो कारण ती रणवीर सिंगसारखी व्यक्तीसोबत राहते. तथापि, अक्षयने हे सर्व विनोदबुद्धीने म्हटले होते. अक्षय कुमारला रणवीर सिंग खूप आवडतो. या मुलाखतीत त्याने रणवीरविषयीही बोलताना सांगितले की, 'रणवीरमध्ये मला माझी झलक दिसते.'
अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच रोहित शेट्टी(Rohit Shetty)चा मच अवेटेड सिनेमा 'सूर्यवंशी' (Sooryavanshi)मध्ये कतरिना कैफसह दिसणार आहे. या व्यतिरिक्त अक्षय सारा अली खान (Sara Ali Khan)आणि साऊथ स्टार धनुषसोबत ‘अतरंगी रे’ चित्रपटात स्क्रीन शेअर करणार आहे. या दोन चित्रपटांव्यतिरिक्त खिलाडी कुमार 'पृथ्वीराज', 'बच्चन पांडे' आणि 'बेल बॉटम' सारख्या मोठ्या सिनेमांचा सुद्धा भाग आहे. भाग घेतील.