Join us

‘खिलाडी’ अक्षय कुमारची मुलगी निताराचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल; मिळाले २३ लाख व्ह्यूज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 18:35 IST

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य हे एकदम व्यवस्थित आहे. तो त्याच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीकडे विशेष लक्ष देताना दिसतो. त्याला चित्रपट आणि प्रमोशन यांच्यामुळे कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही. मात्र त्याला जेव्हाही थोडासा निवांत वेळ मिळतो तेव्हा तो कुटुंबाला पूर्ण वेळ देतो.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य हे एकदम व्यवस्थित आहे. तो त्याच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीकडे विशेष लक्ष देताना दिसतो. त्याला चित्रपट आणि प्रमोशन यांच्यामुळे कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही. मात्र त्याला जेव्हाही थोडासा निवांत वेळ मिळतो तेव्हा तो कुटुंबाला पूर्ण वेळ देतो. असाच निवांत वेळ तो सध्या त्याच्या मुलांसोबत घालवत आहे. त्याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे ज्यात तो त्यांची मुलगी नितारा हिच्यासोबत वर्कआऊट करताना दिसतो आहे. या व्हिडीओला २३ लाखांहून जास्त युजर्सनी पाहिले आणि लाईक केले आहे. 

 

  या व्हायरल झालेल्या व्हिडीओत तो त्याची मुलगी नितारा हिच्यासोबत वर्कआऊट करताना दिसतो आहे. यात केवळ त्याचा आवाज असून तो तिच्याकडून वर्कआऊट करवून घेत आहे. या व्हिडीओला २३ लाख नेटिझन्सनी पाहिले आहे. नितारा एकदम वजनदार अशा दोरींसोबत वर्कआऊट करताना दिसत आहे. अक्षय कुमार खरंच खूप उत्कृष्ट वडील आहे. तो कायम त्याच्या कुटुंबाची काळजी करत असतो. त्यांच्यासोबत वेळ घालवत असतो. तो सातत्याने त्याचे मुलांसोबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. यापूर्वीही त्याने निताराच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक तिच्यासोबतचा फोटो पोस्ट केला होता आणि त्यासोबतच एक भावूक मेसेज देखील लिहिला होता.

टॅग्स :अक्षय कुमार