जे बात! हॉलिवूड सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार अली फजल, 'कोड नेम: जॉनी वॉकर' असेल सिनेमाचं टायटल

By अमित इंगोले | Published: October 24, 2020 12:19 PM2020-10-24T12:19:52+5:302020-10-24T12:20:17+5:30

अनेक हॉलिवूड आणि ब्रिटीश प्रोजेक्ट्स केलेला अली फजल आता हॉलिवूडच्या एका वॉर ड्रामा सिनेमात चक्क मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Actor Ali Fazal will be in lead role in Hollywood film Code Name Johnny Walker | जे बात! हॉलिवूड सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार अली फजल, 'कोड नेम: जॉनी वॉकर' असेल सिनेमाचं टायटल

जे बात! हॉलिवूड सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार अली फजल, 'कोड नेम: जॉनी वॉकर' असेल सिनेमाचं टायटल

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता अली फजल इंडियन फिल्म इंडस्ट्रीतील एक असं नाव आहे ज्याला परदेशातही ओळख मिळाली आहे. अनेक हॉलिवूड आणि ब्रिटीश प्रोजेक्ट्स केलेला अली फजल आता हॉलिवूडच्या एका वॉर ड्रामा सिनेमात चक्क मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचं नाव 'कोड नेम- जॉनी वॉकर' असं असेल. हा सिनेमा याच नावाच्या एका नावेवर बनला आहे जी इराक युद्धाची एक सत्यकथा आहे.

हा सिनेमा ऑस्कर अवॉर्डसाठी नॉमिनेट झालेले लेखक ऐलन वेंकुस आणि जिम डेल्फिस हे दोघे लिहिणार आहेत. या सिनेमावर सप्टेंर २०१५ पासून काम सुरू आहे. कोरोना संपल्यावर लवकरच अली फजल लॉस एंजलिस जाणार आणि येथील एका स्टुडिओत सिनेमाच्या शूटींगची तयारी करेल. या सिनेमात इराकच्या एका व्यक्तीची कथा आहे जो अमेरिकन नेव्ही सील कमांडोजसोबत राहतो आणि ट्रान्सलेटर म्हणून त्यांना मदत करतो. 

दरम्यान, याआधी अली फजलने फास्ट अ‍ॅन्ड फ्युरिअस ७, विक्टोरिया अ‍ॅन्ड अब्दुल आणि डेथ ऑन द नाइलसारख्या सिनेमात काम केलं आहे. डेथ ऑन द नाइलचं रिलीज कोरोनामुळे थांबलं आहे. तसेच अली फजलच्या लोकप्रिय मिर्झापूर सीरीजचा दुसरा सीझनही रिलीज झाला आहे. यातील त्याच्या भूमिकेला फॅन्सचं भरभरून प्रेम मिळत आहे. 

फॅन्सचे मानले आभार

सीरीजमधील एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत अली फजलने लिहिले की, "ज्या प्रकारे मिर्झापूर धमाका करत आहे त्याला हा फोटो फिट बसला. हाहा. तुमच्या भरभरून प्रेमासाठी धन्यवाद. मी आपल्या देशाचं एका फिल्म फेस्टिव्हलमध्ये नेतृत्व करत आहे. त्यामुळे रेग्युलर वेळेवर उपलब्ध नाही. सतत काहीना काही इथे शेअर करत राहणार. बाकी भौकाल नंतर. आता जा आणि सीरीज बघा'. (Mirzapur 2 Dialogues: 'नेता जी बनना है तो गुंडे पालो, गुंडे मत बनो' व्हायरल झाले १० धमाकेदार डायलॉग्स!)

अली फजलच्या या पोस्टला केवळ २ तासात १ लाखांपेक्षा जास्त लोकांना लाइक केले आणि शेअर केले. कमेंट बॉक्समध्ये यूजर्स अलीच्या कामाचं भरभरून कौतुक करत आहेत. अली फजलच्या भूमिकेचं नाव घेत अनेकांनी कमेंट केल्यात. एका यूजरने लिहिले की, "गुड्डू भईया भौकाल मचा दिए."

Web Title: Actor Ali Fazal will be in lead role in Hollywood film Code Name Johnny Walker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.