Join us

दु:खद! ‘दामिनी’ फेम अभिनेते व मिमिक्री आर्टिस्ट माधव मोघे यांचे निधन, कॅन्सरशी झुंज अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 6:21 PM

Mimicry Artist Madhav Moghe Dies : माधव मोघे यांनी दामिनी, घातक, विनाशक, पार्टनर अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांत काम केले होते.

ठळक मुद्दे 1993 साली रिलीज झालेल्या ‘दामिनी’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

लोकप्रिय अभिनेते आणि मिमिक्री आर्टिस्ट माधव मोघे ( Madhav Moghe) यांचे आज रविवारी निधन झाले.  माधव मोघे हे थर्ड स्टेज कॅन्सरशी लढत होते. कॅन्सरशी चाललेली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली. ते 68 वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने  मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. माधव मोघे यांनी दामिनी, घातक, विनाशक, पार्टनर अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांत काम केले होते. विशेषत: ‘शोले’ या चित्रपटातील ठाकूरची मिमिक्री करुन त्यांनी लोकप्रियता मिळवली. छोट्या पडद्यावरच्या अनेक कॉमेडी शोमध्येही त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले. 

 1993 साली रिलीज झालेल्या ‘दामिनी’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सनी देओल आणि मीनाक्षी शेषाद्री यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यावेळी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड़ यशस्वी झाला होता.एमटीव्हीवर ‘फुल्ली फालतू’नावाच्या शोमध्ये त्यांनी ‘शोले’च्या ठाकूरचे पात्र रंगवले होते. ठाकूरची मिमिक्री ते इतकी अफलातून करत की, त्यांना दिवंगत अभिनेते संजीव कुमार यांचा डुप्लिकेट म्हणूनही ओळखले जाऊ लागले होते.  उत्पल दत्त आणि राज कुमार यांची मिमिक्रीही ते अफलातून करत. देशविदेशात त्यांचे मिमिक्री कार्यक्रम लोकप्रिय होते.गतवर्षी 21 जूनला माधव यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्या किडणीच्या आजाराने ग्रस्त होत्या. 

टॅग्स :बॉलिवूड