Join us  

"कंगनाजी कोण आहेत? सुंदर आहेत का?"; अभिनेते अन्नू कपूर यांचं विधान चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 10:42 AM

कंगना रणौतला काही दिवसांपुर्वी CISF जवान महिलेने कानशिलात लगावली. या प्रकरणावर अन्नू कपूर यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय (annu kapoor, kangana ranaut)

बॉलिवूडमधील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते म्हणजे अन्नू कपूर.अन्नू कपूर यांनी 'विकी डोनर', 'जॉली एलएलबी २', 'ड्रीम गर्ल', 'सात खून माफ' अशा सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनात स्वतःची छाप पाडली. अन्नू कपूर सध्या त्यांच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहेत. तो सिनेमा म्हणजे 'हमारे बारह'. सिनेमाच्या वेगळ्या विषयामुळे 'हमारे बारह' सिनेमाच्या रिलीजवर बंदी आणली गेली होती. परंतु कोर्टाने दिलेल्या आदेशामुळे ही बंदी हटवण्यात आली अन् सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. यानिमित्त आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत अन्नू कपूर यांनी कंगना रणौतच्या 'थप्पड' प्रकरणावर भाष्य केलंय.

कंगना रणौत आहे कोण? सुंदर आहे का?: अन्नू कपूर

'हमारे बारह' सिनेमाच्या पत्रकार परिषदेवेळी अन्नू कपूर यांना कंगना रणौतसोबत झालेल्या थप्पड प्रकरणावर बोलतं करण्यात आलं. त्यावेळी अन्नू कपूर म्हणाले, "ही कंगना रणौत कोण आहे? कोणी मोठी अभिनेत्री आहे का? सुंदर आहे का?" अन्नू कपूर पुढे म्हणाले, "जर मी असं काही विधान केलं असतं तर माझं म्हणणं हे बेकार आहे, हे मी सुरुवातीलाच सांगतो. यानंतर जर कोणी मला कानफडात मारली तर मी कायदेशीर मार्गाने जाईल." अशी प्रतिक्रिया अन्नू कपूर यांनी दिली. कंगनाने प्रचारसभेत शेतकरी आंदोलनावर केलेल्या विधानाच्या निषेधार्थ तिला चंदीगढ एअरपोर्टवर CISF जवान महिलेने कानफडात मारली होती. 

अन्नू कपूर यांच्या सिनेमावर वाद का झाला?

अन्नू कपूर यांचा आगामी सिनेमा 'हमारे बारह' ७ जूनला रिलीज होणार होता. परंतु सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला. पुढे १४ जून ही सिनेमाची रिलीज डेट निश्चित करण्यात आली. नंतर हा वाद कोर्टात गेला आणि सिनेमाचं प्रदर्शन पुन्हा थांबण्यात आलं. पुढे कोर्टाने सिनेमाच्या रिलीजला हिरवा झेंडा दाखवला. अखेर हा सिनेमा आज २१ जूनला रिलीज होतोय. सिनेमाच्या विषयामुळे विशिष्ट समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. सिनेमाविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.

टॅग्स :अन्नू कपूरकंगना राणौत