मालिका व चित्रपटात काम मिळवून देतो असं सांगत अनेक खोट्या कास्टिंग एजेंटने लोकांनी फसवणूक केल्याची प्रकरणं समोर येत असतात. पण आता सलमान खानची प्रोडक्शन कंपनी सलमान खान फिल्मच्या नावाने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ज्यात SKF च्या नावाने काही लोकांना ईमेल पाठवण्यात आले आणि सलमानच्या आगामी प्रोजेक्टच्या ऑडिशनची खोटी ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे संपूर्ण प्रकरण टीव्ही अभिनेता अंश अरोराने उघडकीस आणले आणि याबाबत पोलिसात तक्रारसुद्धा दाखल करण्यात आली आहे.एबीपीच्या रिपोर्टनुसार, अंश अरोराला shruti@salmankhanfilm.com वरुन एक ईमेल आला होता. ज्यात त्याला सलमानच्या चित्रपटात रोलची ऑफर करण्यात आली होती. या मेलच्या आधारावरच अंशने ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
अंश अरोराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्याने 'कसम', 'क्वीन' यासारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.