Join us

लोकमत डिजिटल इन्फ्ल्युन्सर अवॉर्डमध्ये अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी व्यक्त केली खंत, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 7:33 PM

Ashish Vidyarthi : लोकमत डिजिटल क्रिएटर अवॉर्ड २०२३ या सोहळ्यात अभिनेते आशिष विद्यार्थी यांना बेस्ट फूड अँड ट्रॅव्हेल कॉन्टेंट क्रिएटरच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Lokmat Digital Creator Awards : लोकमत डिजिटल क्रिएटर अवॉर्ड २०२३ सोहळ्याला सुरूवात झाली आहे. या पुरस्कार सोहळ्यात डिजिटल माध्यमात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरविण्यात येत आहे. या सोहळ्यात अभिनेते आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi) यांना बेस्ट फूड अॅण्ड ट्रॅव्हेल कॉन्टेंट क्रिएटरच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपले मनोगत मांडताना त्यांनी एक खंत व्यक्त केली. ते म्हणाले की, जेव्हा लोक तुम्ही छान अभिनेते होतात, असे बोलतात तेव्हा वाईट वाटते.

आशिष विद्यार्थी हे एक भारतीय अभिनेता आहेत ज्यांनी प्रामुख्याने हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, इंग्रजी, ओडिया, मराठी आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते निगेटिव्ह भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे आणि आता ते डिजिटल माध्यमातूनही लोकांचे मनोरंजन करत आहेत. युट्युब आणि इंस्टाग्रामवर त्यांचे लाखो फॉलोव्हर्स आहेत. प्रवास आणि खाद्य व्लॉग्सद्वारे आशिष विद्यार्थी अनेकांची मने जिंकत आहेत. त्यांनी लोकमत डिजिटल क्रिएटर अवॉर्डमध्ये बेस्ट फूड अॅण्ड ट्रॅव्हेल कॉन्टेंट क्रिएटरचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर लोकमतचे आभार मानले. 

यावेळी ते म्हणाले की, मला हा पुरस्कार दिला त्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. हे खूप वेगळे जग आहे. सिनेइंडस्ट्रीतल्या लोकांसाठी हे सरप्राइज आहे. आपण पाहिलं आहे की डिजिटल माध्यमातून आपल्या टॅलेंटच्या जोरावर कित्येक जण प्रसिद्धीझोतात आले. या प्लॅटफॉर्ममुळे आता आपलं टॅलेंट दाखवण्यासाठी कोणाच्या मदतीची गरज नाही.

ते पुढे म्हणाले की, मी एक भूतकाळातील अभिनेता झालो होतो. लोक मला भेटल्यावर बोलायचे की तुम्ही खूप चांगले अभिनेते होतात. त्यावेळी वाईट वाटायचे. दोन वर्षांपासून मी या नवीन प्रवासाला सुरुवात केली. जिथे मी नवीन नवीन लोकांना भेटतो. त्यांच्या स्टोरी ऐकतो आणि सोबत पदार्थांचा आस्वादही घेतो. फक्त तरूणच नाही तर माझ्यासारख्या लोकांसाठी हे प्लॅटफॉर्म मिळाले. त्यासाठी मी आभारी आहे.

टॅग्स :आशिष विद्यार्थीलोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१