कुणी काम देता का काम? ज्येष्ठ अभिनेते अवतार गिल यांना हवंय काम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 11:12 AM2021-02-23T11:12:21+5:302021-02-23T11:12:39+5:30

मी मेंटली व फिजिकली फिट...मला काम हवंय...

actor avtar gill says i need work in bollywood and i am mentally and physically fit for acting | कुणी काम देता का काम? ज्येष्ठ अभिनेते अवतार गिल यांना हवंय काम

कुणी काम देता का काम? ज्येष्ठ अभिनेते अवतार गिल यांना हवंय काम

googlenewsNext
ठळक मुद्देमी अजूनही थिएटर करतोय. पण नव्या पिढीसोबत काम करण्यास मी उत्सुक आहे. माझ्या वयाला साजेसे रोल मला करायचे आहेत, असे ते म्हणाले.

नूरी, मशाल, गुलामी, डॅडी, रंगीला, दिलवाले, मृत्यूदंड अशा सुमारे 300 सिनेमात काम करणारे आणि आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण करणारे अभिनेते अवतार गिल सध्या काय करताहेत तर काम मागत आहेत. होय, मी काम करण्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अगदी फिट आहे. मला काम करायचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत, त्यांनी नव्या पिढीसोबत काम करण्याची इच्छा बोलून दाखवली. बॉलिवूडची नवी पिढी माझ्यासारख्या ज्येष्ठ कलाकारांना सोबत घेऊन चालत नाही. आम्ही यांना ओळखत नाही, असा  या पिढीचा तोरा असतो. माझे मात्र या सिनेसृष्टीवर प्रचंड प्रेम आहे.  स्ट्रगलच्या दिवसात राज कपूर यांच्या एका सिनेमात 3 मिनिटांचा रोल मिळाल्यावर पुढचे 3 महिने मी अक्षरश: नशेत होतो. 43 वर्षे बॉलिवूडमध्ये काम केल्यानंतरही मला काम मागण्यात जराही लाज वाटत नाही. मला फक्त काम हवे आहे. मी मेंटली व फिजिकली पूर्णपणे फिट आहे. मला इंडस्ट्रीतून हटवले गेले, मी गायब झालेलो नाही. सध्या माझ्याकडे कामचं नाही, असे नाही. मी अजूनही थिएटर करतोय. पण नव्या पिढीसोबत काम करण्यास मी उत्सुक आहे. माझ्या वयाला साजेसे रोल मला करायचे आहेत, असे ते म्हणाले.

बॉलिवूडमधील नव्या पिढीला मी एवढेच सांगेन की, तुम्ही धावत आहात तर आम्हालाही सोबत घेऊन धावा. निश्चितपणे तुमचा धावण्याचा वेग जास्त आहे. आम्ही त्या वेगाने धावू शकणार नाही. पण तुमच्या मागे तर नक्कीच येऊ शकतो. आम्ही तुम्हाला हरवू शकत नाही, पण तुमच्यासोबत नक्कीच धावू शकतो, असेही ते म्हणाले.

Web Title: actor avtar gill says i need work in bollywood and i am mentally and physically fit for acting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.