Join us

कार्तिक आर्यन अडकणार लग्नबंधनात? फोटो शेअर करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 18:43 IST

नुकतेच सोशल मीडियावर त्यानं एक पोस्ट केली आहे.

तरुणाईच्या गळ्यातील ताईत असणारा अभिनेता कार्तिक आर्यन फार कमी वेळातच लोकप्रिय झाला. पाहता पाहता कार्तिकच्या चाहत्यांचा आकडाही वाढत होता. तरुणींमध्ये तर, त्याचं भलतंच वेड. पडद्यावरच्या त्याच्या अभिनयाशिवाय त्याच क्युट हास्य आणि व्यक्तिमत्त्व यावर असंख्य तरुणी जीव ओवाळून टाकतात. कार्तिक मीडियावरही सक्रिय असते. नुकतीच सोशल मीडियावर त्यानं एक पोस्ट केली आहे. ज्याच्या कॅप्शनमुळे वेगळ्याच चर्चेला वळण मिळालं आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये बरेच सेलिब्रिटीज हे लग्नबंधनात अडकत आहेत अन् अशातच आता  कार्तिक आर्यनचंही नाव पुढे आलं आहे. आपल्या नव्या इंस्टाग्राम पोस्टमुळे  कार्तिक चर्चेत आला आहे. कार्तिकने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कार्तिक खूपच हँडसम दिसत आहे. हे फोटो शेअर करून कार्तिकने कॅप्शनमध्ये लिहिले, "शादी ready!". त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. 

कार्तिकच्या आगामी सिनेमांसह त्याच्या लग्नाची चाहत्यांना आता प्रतीक्षा आहे. त्याच्या लव्हलाईफबद्दल बोलायचे झाल्यास,  कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री  सारा अली खान हे दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. मात्र कालांतराने त्यांचा ब्रेकअप झाला आणि ते वेगळे झाले. मात्र या जोडीचे चाहते आजही आहेत. पण आता दोघांमध्ये पॅचअप झाल्याचं म्हटलं जात आहे.  कारण, दोघांचा लेटेस्ट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये सारा अली खान ही कार्तिक आर्यनला फ्लाइंग किस देताना दिसली. 

आता पुन्हा सारा आणि कार्तिकला एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. कामाबद्दल बोलायचं झाल्यास, कार्तिक आर्यन हा 2023 मध्ये प्रदर्शित कार्तिकचा 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट सुपरहिट झाला. याशिवाय गेल्या अनेक दिवसांपासून कार्तिक कबीर खान दिग्दर्शित 'चंदू चॅम्पियन' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट याच वर्षी ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय कार्तिक आगामी हंसल मेहताच्या 'कॅप्टन इंडिया' आणि 'भूल भुलैया 3'चाही समावेश आहे. 

टॅग्स :कार्तिक आर्यनबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमालग्नसोशल मीडियासारा अली खान