Join us

अभिनेता मनोज वायपेयी सांगतांय त्यांचं फिटनेस सिक्रेट, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2024 4:34 PM

सध्या मनोज वायपेयी ''किलर सूप'' सिनेमामुळे चर्चेत आहेत.

'द फॅमिली मॅन' या वेब सिरीजमधून आणि इतर अनेक बॉलिवूड चित्रपटांतून आपला ठसा उमटवणारा प्रसिद्ध चित्रपट अभिनेता म्हणजे मनोज वायपेयी.  चाहत्यांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. मनोज यांनी आतापर्यंत अनेक दमदार भूमिकांना न्याय देत चाहत्यांचं मनोरंजन केलं. मनोज हे  फिटनेसच्या बाबतीत कायम सजग असतात. मनोज वाजपेयी यांनी त्यांच्या दैनंदिन दिनचर्या आणि आहाराबाबत खूप कडक नियम पाळले आहेत. 

सध्या ते ''किलर सूप'' सिनेमामुळे चर्चेत आहेत. ''किलर सूप'' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी मनोज अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. 'कर्ली टेल्स' शी बोलताना त्यांनी सांगितलं की,'दुपारी ३ नंतर जेवण करत नाहीत. तसेच कधी चुकून खाणे झाले तर त्यानंतर जवळपास बरेच तास जेवण करत नाहीत'.  तसेच या आधी त्यांनी आज तकच्या 'सिधी बात' या शोमध्ये आजोबांकडून प्रेरणा घेत त्यांचे डाएट फॉलो केल्याचे मनोज यांनी सांगितले होते.

ते म्हणाले, जवळपास गेल्या १४ वर्षात रात्री जेवणच घेतलेले नाही. अगदीच खूप भूक लागली तर हेल्दी फूड खातो. माझे आजोबा  दिसायला बारीक अन् सडपातळ होते. ते. पण त्यांची प्रकृती नेहमीच कौतुकाचा विषय राहिली आहे. ते अगदी संध्याकाळी ६ वाजता जेवण करायचे. त्यानंतर काही खायचे नाही. तसेच मीही सुरू केले. शिवाय एका डॉक्टरांनी मला रात्री उशिरा जेवण सोडल्यास अर्धे आजार तिथेच बरे होतात असे सांगितले होते'.

मनोज यांनी काही दिवसांपुर्वीच त्यांनी एक शर्टलेस फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यात कॅप्शनमध्ये त्यांनी लिहलं, 'नव्या वर्षातील नवा मी! माझ्या शरीरावर सूपचा परिणाम पाहा. एकदम किल्लर लुक आहे ना?'. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला होता. मनोज आणि कोंकणा सेन शर्मा यांची  ''किलर सूप'' ही सीरिज सीरिज 11 जानेवारी रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.  मनोज वाजपेयी यांचा काही दिवसांपूर्वी गुलमोहर हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला होता. 

टॅग्स :मनोज वाजपेयीसेलिब्रिटीबॉलिवूड