Join us

​अभिनेता नरेंद्र झा यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 4:44 AM

अभिनेता नरेंद्र झा यांचे निधन. वाडा इथेली फॉर्म हाऊसवर घेतला अखेरचा श्वास. सकाळी 5 वाजता ह्रदयविकाराच्या झटक्याने झाले निधन. ...

अभिनेता नरेंद्र झा यांचे निधन. वाडा इथेली फॉर्म हाऊसवर घेतला अखेरचा श्वास. सकाळी 5 वाजता ह्रदयविकाराच्या झटक्याने झाले निधन. याआधी त्यांना दोनवेळा ह्रदयविकाराचा झटका आला होता. विशाल भारद्वाजच्या 'हैदर' सिनेमातील डॉ. मीर हिलाल असो किंवा 'घायल रिटर्न्स' सिनेमातील राज बन्सल ही भूमिका साकारली होती. आतापर्यंत विविध प्रकारचे सिनेमा आणि विविध शेड असलेल्या भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. 'हैदर' सिनेमातील डॉ. मीर हिलाल ही भूमिका मला चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देते. त्यामुळे त्यांच्यासाठी ही भूमिका सगळ्यात आवडती होती. या व्यतिरिक्त काबील, श्याम बेनेगल यांच्या सिनेमात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि संविधानमध्ये साकारलेली मोहम्मद जिना या भूमिकाही त्यांच्या माझ्या कायम लक्षात राहिल्या होत्या. सिनेमा साईन करण्यापूर्वी सिनेमा कोण बनवत आहे, सिनेमातील भूमिका आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सिनेमाची कथा कशी असणार या सगळ्या गोष्टींचे समाधान झाले की मग ते सिनेमा स्वीकारायचे. सिनेमात कलाकार जीव ओतून काम करत असेल आणि ती भूमिका लोकांपर्यंत पोहोचलीच नाही असे होण्यापेक्षा आपले काम रसिकांना कितपत आवडेल याचा ते नेहमीच विचार करायचे. त्यांना पॉझिटिव्ह भूमिका करायल्या आवडाच्या. त्यांना मालिकांसाठी ब-याचदा विचारणा झाली होती. मात्र सिनेमाच्या शूटिंगच्या बिझी शेड्युलमुळे मालिकांसाठी वेळ देणे त्यांना खूप कठीण जाते होते. देशाप्रती त्यांना प्रचंड होते. देशाप्रती प्रत्येकाची एक नैतिक जबाबदारी असते असे त्यांचे म्हणणे होते. जाहिरात क्षेत्रातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. 70 पेक्षा जास्त मालिकांमध्ये त्यांनी काम केले होते. हिंदी शिवाय त्यांनी तामिळ, तेलुगू चित्रपटात काम केले नव्हते.