नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. काही महिन्यांपूर्वी एका सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान नवाजने एका किस्सा सांगितला होता. नवाजला स्ट्रगलिंगच्या दिवसांत ऑडिशन दरम्यान अनेक सिनेमांमधून रिजेक्ट करण्यात आले होते.
नवाजने पहिल्यांदा ऑडिशनसाठी जेव्हा आपला फोटो पाठवला होता. त्यावेळी त्याला फोटोग्राफरच्या भूमिकेसाठी बोलवण्यात आले होते. मात्र त्याला रिजेक्ट करण्यात आले. आज नवाजचे नाव बॉलिवूडचा सर्वोत्तम अभिनेत्यांची यादीत सामील आहे.
नवाजुद्दीनचा बॉलिवूडमधील प्रवास अतिशय खडतर होता. तो एका छोट्याशा गावातून आलेला आहे. त्याच्या कुटुंबातील कोणाचाच या इंडस्ट्रीशी संबंध नव्हता. त्याची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती. पण तरीही अभिनयक्षेत्रात यायचे असे त्याने अनेक वर्षांपूर्वीच ठरवले होते. त्यामुळे तो नशीब आजमवायला छोट्याशा गावातून मुंबईत आला. मुंबईत आल्यावर सुरुवातीला अनेक चित्रपटांमध्ये त्याने छोट्या भूमिका साकारल्या. सरफरोश, मुन्नाभाई एमबीबीएस यांसारख्या चित्रपटात तो छोट्याशा भूमिकांमध्ये दिसला. ब्लॅक फ्रायडे या चित्रपटामुळे त्याच्या करियरला खरी दिशा मिळाली.