दाक्षिणात्य स्टार नितीनचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. त्याच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्याच्या लग्नाच्या रितीरिवाजाला सुरूवात झाली आहे. हा कार्यक्रम पाच दिवस चालणार आहे.
22 जुलैला नितीन आणि शालिनी कंडूकुरी यांचा हैदराबादमध्ये साखरपुडा पार पडला. ही माहिती खुद्द त्यानेच सोशल मीडियावर दिली.
आता 26 जुलै रोजी नितीन आणि शालिनी यांचे हैदराबादमधील प्रसिद्ध फलकनुमा पॅलेस हॉटेलमध्ये विवाह सोहळा संपन्न होणार आहे.
कोरोना व्हायरसच्या संकटामुळे या लग्नात फक्त कुटुंबातील मंडळी आणि काही मित्र उपस्थित राहणार आहेत.
नुकतेच नितीनने तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना भेटून त्यांना लग्नाचे निमंत्रण दिले होते.
सूत्रांच्या माहितीनुसार अभिनेता व नेता पवन कल्याण या लग्नात वरूण तेज व त्रिविक्रम श्रीनिवास यांच्यासोबत हजेरी लावू शकतात.