Join us

अभिनेता राजकुमार रावच्या वडिलांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2019 2:23 PM

अभिनेता राजकुमार राव याच्या चाहत्यांसाठी एक दु:खद बातमी आहे. राजकुमारचे वडिल सत्यपाल यादव यांचे निधन झाले आहे.

ठळक मुद्देराजकुमारचे खरे आडनाव यादव आहे.

अभिनेता राजकुमार राव याच्या चाहत्यांसाठी एक दु:खद बातमी आहे.  राजकुमारचे वडिल सत्यपाल यादव यांचे निधन झाले आहे. ते 60 वर्षांचे होते.सत्यपाल यादव गत 17 दिवसांपासून मेदांता हॉस्पिटलमध्ये भरती होते. गुरुवारी मध्यरात्री त्यांनी अंतिम श्वास घेतला.राजकुमार हा मुळचा गुरूग्रामचा आहे. याचठिकाणी आज त्याच्या वडिलांवर अंत्यसंस्कार होत आहेत.

सिटीलाईट्स, शादी में जरूर आना, न्यूटन, स्त्री असे शानदार चित्रपट देणारा अभिनेता राजकुमार राव याने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक ओळख निर्माण केली. लहानपणापासून राजकुमार राव बॉलिवूड स्टार्सची मिमिक्री करायचा. पण भविष्यात अभिनेता बनण्याचा विचारही त्याच्या मनात नव्हता. मात्र दहावीत असताना त्याने एका नाटकात काम केले आणि इथूनच अभिनेता बनायचा निर्णय त्याने घेतला. अर्थात यासाठी त्याला मोठा संघर्ष करावा लागला.  

राजकुमारचे खरे आडनाव यादव आहे. पण हरियाणामध्ये राव आणि यादवचा अर्थ एकच आहे, असे राजकुमार सांगतो. इतका संघर्ष करूनही लेकाला यश मिळत नाही, असे दिसल्यावर आईने राजकुमारला नावात बदल करण्याचा सल्ला दिला होता. आईच्या सांगण्यावरून राजकुमारने त्याच्या नावातल्या स्पेलिंगमध्ये आणखी एक ‘एम’जोडण्याचा  आणि आडनाव बदलले होते. त्याच्या आईला एका न्यूमरोलोजिस्ट हा सल्ला दिला होता.

टॅग्स :राजकुमार राव