Join us

"हे माझं काम नाही...", पाकिस्तानातून आलेल्या धमकीवजा मेलवर राजपाल यादवची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 15:43 IST

राजपाल यादव यांनी दिलेल्या स्टेटमेंटनुसार ते म्हणाले की...

कलाविश्वात एका बातमीने खळबळ माजली आहे. अभिनेते राजपाल यादव, कोरिओग्राफर रेमो डिसुझा आणि कॉमेडिअन कपिल शर्माला थेट पाकिस्तानमधून जीवे मारण्याची धमकी आली. ई मेलद्वारे त्यांना ही धमकी मिळाली आहे. तिघांनी पोलिसात तक्रा केली असून सायबरस सेलही आता याचा तपास करत आहे. दरम्यान राजपाल यादव यांनी नुकतंच या प्रकरणावर अधिकृत स्टेटमेंट जारी केलं आहे.

राजपाल यादव (Rajpal Yadav) यांनी दिलेल्या स्टेटमेंटनुसार ते म्हणाले की पोलिस आणि सायबर क्राइम सेल यांना धमकीच्या मेलबाबतीत कळवलं आहे. या घटनेवर फारसं  काही बोलायचं नसून पोलिस याचा योग्य  तो तपास करत आहेत. तसंच ते म्हणाले, "खरंतर, या घटनेवर बोलणं माझं काम नाही कारण मला याबद्दल काहीच माहित नाही. मी अभिनेता आहे आणि अभिनयाच्या माध्यमातून मी तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतो. मला याहून जास्त काही सांगायचं नाही. या प्रकरणात जे काही सांगायची गरज आहे ते पोलिस आणि सायबर एजन्सी सांगतील. मला जे माहित होतं ते मी सांगितलं."

राजपाल यादव यांच्या पत्नीच्या तक्रारीवरुन आंबोली पोलिसांनी अज्ञाताविरोधात कलम ३५१(३) अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. १४ डिसेंबर रोजी राजपाल यादव यांना हा धमकीवजा मेल आला होता. ईमेल पाठवणाऱ्याने त्याचं नाव विष्णु सांगितलं तर हँडलचं नाव don99284 असं होतं. 

धमकीत काय लिहिलं?

कलाकारांना आलेल्या या ईमेल मध्ये लिहिले आहे की, "आम्ही तुमच्या सर्व हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहोत. एका संवेदनशील प्रकरणावर तुमचं लक्ष जाणं गरजेचं आहे. हा काही पब्लिसिटी स्टंट किंवा तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न नाही. आम्ही विनंती करतो की या मेसेजला गांभीर्याने घ्या आणि गुप्तता ठेवा." ईमेल पाठवणाऱ्याने ८ तासांची मुदतही दिली आहे. या तासात मागणी पूर्ण झाली नाही तर वाईट परिणाम होती असंही लिहिलं आहे.

टॅग्स :राजपाल यादवपाकिस्तानसोशल मीडिया