Join us

पंतप्रधान मोदींसोबत भेटीचा अनुभव कसा होता? रणबीर कपूर म्हणाला, "त्यांच्यात एक चार्म आहे जो..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 18:50 IST

चार-पाच वर्षांपूर्वी रणबीर कपूर पंतप्रधान मोदींना भेटला होता. त्याचा अनुभव त्याने शेअर केलाय (ranbir kapoor, pm narendra modi)

रणबीर कपूर हा बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता. रणबीर कपूरला आपण विविध सिनेमांमधून बहुढंगी बहुरुपी भूमिका करताना पाहिलंय. रणबीर तसं जाहीर मुलाखती देताना दिसत नाही. पण नुकतंच रणबीरने निखिल कामथ यांना दिलेल्या मुलाखतीत त्याच्या आयुष्यात घडलेल्या विविध पैलूंचा उलगडा केलाय. याच मुलाखतीत रणबीरने पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या भेटीचा उल्लेख करुन आलेला अनुभव शेअर केलाय. 

पंतप्रधान मोदींना भेटून आल्यावरचा अनुभव कसा होता?

या मुलाखतीत निखिल कामथ यांनी सुरुवातीला पंतप्रधान मोदींच्या भेटीचा अनुभव शेअर केला. नंतर रणबीरने काही वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींची जी भेट घेतली होती तो अनुभव मुलाखतीत सांगितला. रणबीर म्हणाला, "चार-पाच वर्षांपूर्वी माझ्यासारखे युवा अभिनेते पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला गेले होते. आम्ही सर्व एका खोलीत बसलो होतो. काही वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आले. त्यांच्यात लोकांना खेचून घेण्याचा एक मॅग्नेटिक चार्म आहे."

मोदींनी केली प्रत्येकाची विचारपूस: रणबीर कपूर

रणबीर कपूर या भेटीला आठवून पुढे म्हणाला की, "पंतप्रधान मोदींनी प्रत्येकाची विचारपूस केली. त्यांनी मला बाबांच्या तब्येतीबद्दल विचारलं. त्यांच्यावर उपचार कसे सुरु आहेत, याविषयी त्यांची काळजीपूर्वक जाणून घेतलं. त्यांनी आलिया तसंच विकी कौशल अशा प्रत्येक व्यक्तीला काही ना काही विचारलं. महान व्यक्ती अशी प्रत्येकाची दखल घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे हा गुण नरेंद्र मोदींबद्दल खूप काही सांगून जातो."

टॅग्स :रणबीर कपूरनरेंद्र मोदीआलिया भटविकी कौशल