तुमच्या अंगी कला असेल तर यश, पैसा आणि प्रसिद्धी नक्की मिळते. हे सिद्ध करून दाखवलंय रितेश देशमुखने. रितेशने 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. रितेशचे वडील दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे महाराष्ट्रातच्या राजकारणाचे एक मोठे नाव होते. संपूर्ण देशमुख घराणं राजकारणात सक्रिय असलं तरी रितेशला लहानपणापासून अभिनेताच व्हायचं होतं. हिंदी सिनेमानंतर रितेशची मराठी सिनेमात झाली. हाथ भारी.... सगळंच लय भारी, या डायलॉगने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं. पहिलावहिला मराठी सिनेमा लय भारी सिनेमातील या डायलॉगने मराठी मनावर आणि तरुणाईवर जादू केली होती. एका न्यूज पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार आज रितेश कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. त्याच्याकडे जवळपास १४४ कोटींची प्रॉपर्टी आहे.
महाराष्ट्रावरील कोल्हा'पूरसंकट' देशाने पाहिलंय, बॉलिवूड कलाकारामध्ये सगळ्यात आधी रितेश देशमुखने पत्नी जेनेलिया डिसूजासह पुरग्रस्तांसाठी २५ लाखाची मदत केली होती. त्यांनी २५ लाखांचा चेक मुख्यमंत्री मदत निधीसाठी दिला होता. गेल्या वर्षी जेनिलियाने पती रितेशला वाढदिवसानिमित्त खूप छानसे सरप्राईज गिफ्ट दिले होते. जेनेलियाने रितेशनला गिफ्ट म्हणून टेस्ला एक्स ही महागडी कार दिली होती.
ही कार त्यावेळी नुकतीच भारतात लाँच झाली होती. जेनेलियाने वाढदिवसाला दिलेल्या गिफ्टचा फोटो रितेशने ट्विटरवर शेअर केला होता. या फोटोला त्याने समर्पक अशी कॅप्शनही दिली होती. तो म्हणाला होता की, ४० वर्षांच्या बर्थ डे बॉयला २० वर्षांचा असल्याप्रमाणे कसे समजून द्यायचे हे माझ्या बायकोला नेमके माहीत आहे.