सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात सोशल मीडियावर सांगितले. बॉलिवूडमधील घराणेशाही कशी चालते आणि बाहेरुन आलेल्यांवर कसा अन्याय होतो, यावर सध्या काही कलाकार उघडपणे बोलताना दिसत आहेत. अभिनेत्री कंगना रनौत, प्रकाश राज यांनी नेपोटिझमवर भाष्य केल्यानंतर आता आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याने त्याच्यासोबत झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे.सुशांत सिंग राजपूतला सहा चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते आणि म्हणून त्याने टोकाचा निर्णय घेतला, असे बोलले जात आहे. याचाच संदर्भ देत 'स्टाइल' चित्रपटातील अभिनेता साहिल खानने देखील एका अभिनेत्यावर आरोप केले आहेत. हा अभिनेता कोण हे त्याने स्पष्टपणे सांगितले नसले तरी त्याच्या बोलण्यावरून तो अभिनेता सलमान खान किंवा शाहरुख खान यांच्यापैकी एकावर निशाणा साधल्याचे जाणवते. पोस्टसोबत त्याने स्टारडस्ट या मासिकावर सलमान खान व शाहरुख खानसोबत छापलेला त्याचा फोटोही शेअर केला आहे.
सुशांत सिंग राजपूतने त्यांचा खरा चेहरा जगाला दाखवला आहे. यावरून समजते की ही लोक नव्या चेहऱ्यांना किती घाबरतात. वीस वर्षात जॉन अब्राहम सोडले तर कोणीच नवीन इंडस्ट्रीमध्ये स्टार झाला नाही. कारण कोणी येऊच देत नाही नवीन लोकांना. फक्त स्टार्सच्या मुलांनाच काम मिळते.' अशी पोस्ट साहीलने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.