बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या बाबतीत एक मोठी माहिती समोर आली आहे. सैफ अली खानवर कोकिलाबेन रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली आहे. सैफला रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याचे चाहते चिंतेत होते. सैफनं स्वत: त्याच्या तब्येतीचं अपडेट चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. सैफ अली खानवर शस्त्रक्रिया झाली असून आता तो पूर्वीपेक्षा बरा असून त्याला डिस्चार्जही मिळाला आहे.
'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खानने सांगितले की, 'माझ्या गुडघ्यावर आणि पाठीवर शस्त्रक्रिया झाली नाही. मला ट्रायसेप्सचा (ट्रायसेप्स हा आपल्या हातातील सर्वात मोठा स्नायू आहे) त्रास होत होता. कधी कमी तर कधी जास्त असा त्रास होत होता. देवरा या चित्रपटासाठी अॅक्शन सीन करत असताना मला थोडी दुखापत झाली होती. तेव्हा वेदना होऊ लागल्या. म्हणून मी एमआरआय करून घेतला'.
त्यानं पुढे सांगितले की, 'डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. आता शस्त्रक्रिया झाली आहे. चित्रपटाचे बहुतांश शुटिंग झालं आहे. आता मी एक महिन्याच्या सुट्टीवर आहे. त्यामुळे मी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला'. जर शस्त्रक्रिया झाली नसती तर त्याचा एक हात गमवावा लागला असता, असेही त्याने सांगितले.
सैफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, तो लवकरच चाहत्यांसाठी दोन मोठे सरप्राईज घेऊन येणार आहे. तेलुगू चित्रपट 'देवरा' आणि हिंदी चित्रपट 'गो गोवा गॉन' मध्ये तो दिसणार आहे. या सिनेमांमधून सैफ अली खान मोठ्या पडद्यावर जबरदस्त कमबॅक करणार आहे.