Join us

"लॉरेन्स बिश्नोईला पाठवू?" भल्या पहाटे सलीम खान यांना धमकी, बुरखाधारी महिलेने रस्ता अडवून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 15:11 IST

सलमान खान कुटुंबाला आज पहाटे पुन्हा एकदा धमकी मिळाली असून सलीम खान यांना रस्त्यात अडवल्याची गोष्ट घडलीय (salman khan)

गेल्या काही महिन्यांपासून सलमान खान आणि त्याला येणाऱ्या धमक्या या प्रकरणांमुळे सर्वांनाच धक्का बसलाय. काही महिन्यांपूर्वी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास घ्यायला सुरुवात केलीय. या प्रकरणी दरदिवशी नवीन अपडेट येत असताना आज पुन्हा एकदा खान कुटुंबाला धमकी मिळालीय. सलीम खान आज पहाटे चालायला गेले असताना बुरखाधारी महिलेने लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने सलीम यांना धमकी दिलीय.

सलीम खान यांचा रस्ता अडवून महिलेने...

सलीम खान आज वांद्रे येथे असलेल्या गॅलॅक्सी अपार्टमेंटमधून पहाटे मॉर्निंग वॉकला बाहेर पडले. त्याचवेळी एका बाईकस्वाराने त्यांचा रस्ता अडवला. दोघांपैकी एकाने बुरखा घातला असून ती महिला होती. त्या महिलेने सलीम खान यांना अडवून "लॉरेन्स बिश्नोईला पाठवू काय?" असं विचारलं. पुढे ते दोघे पळून गेले. अशाप्रकारे सलीम खान यांना अडवून पुन्हा एकदा सलमान खान आणि खान कुटुंबाला धमकी मिळालीय. 

पोलिसांनी केली अटक

ईटाईम्सच्या रिपोर्टनुसार पोलिसांनी बाईकस्वार आणि बुरखाधारी महिलेला बेड्या ठोकल्या आहेच. CCTV फूटेजच्या माध्यमातून पोलीस या दोघांचा शोध घेण्यात यशस्वी झाले आहेत. पोलिसांच्या सांगण्याप्रमाणे, "या दोघांनी सलीम खान यांच्याशी फक्त मस्ती केली. आम्ही त्यांना अटक केली आहे. त्यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही." याआधी ७ एप्रिलला सलमानच्या घराबाहेर दोन अज्ञात बाईकस्वारांनी गोळीबार केला होता. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली होती.  त्यानंतरही अनेकदा सलमानला जीवे मारण्याच्या धमकी मिळाल्या आहेत.

टॅग्स :सलमान खानसलीम खान