Join us  

शाहरुखकडून झाली 'गलती से मिस्टेक'! व्हिडीओ शूट करताना 'या' आगामी सिनेमाची स्क्रीप्ट दिसली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 12:31 PM

शाहरुख खानच्या आगामी सिनेमाची स्क्रीप्ट त्याच्या व्हिडीओत दिसली. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली (shahrukh khan)

शाहरुख खान हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. शाहरुखचे सिनेमे म्हणजे हमखास मनोरंजनाची गॅरंटी हे समीकरण ठरलेलं आहे. शाहरुखचे गेल्या वर्षभरात 'पठाण', 'जवान', 'डंकी' हे सिनेमे चांगलेच सुपरहिट ठरले. शाहरुख अलीकडेच IPL च्या हंगामात प्रत्येक मॅचमध्ये त्याचा संघ 'कोलकाता नाईट रायडर्स'ला सपोर्ट करताना दिसला. शाहरुख आगामी कोणत्या सिनेमात काम करणार, याची सर्वांना उत्सुकता होती. अशातच शाहरुखच्या आगामी सिनेमाची स्क्रीप्टच सर्वांना दिसली.

शाहरुखकडून चूक झाली, आगामी सिनेमाची स्क्रीप्ट दिसली

झालं असं की.. शाहरुखच्या फॅन क्लबने नुकताच त्याचा एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत शाहरुखने सुप्रसिद्ध सिनेमेटोग्राफर आणि त्याच्या 'अशोका' सिनेमाचे दिग्दर्शक संतोष सिवन यांचं कौतुक केलं. संतोष यांना ७७ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये Pierre Angenieux ExcelLens हा पुरस्कार मिळाला. त्यानिमित्ताने शाहरुखने व्हिडीओ शूट केला. पण या व्हिडीओत शाहरुखच्या शेजारी आगामी 'किंग' सिनेमाची स्क्रीप्ट दिसली. 

'किंग' सिनेमाविषयी थोडंसं..

आपल्या सर्वांना माहितच आहे की शाहरुख फरहान अख्तरच्या आगामी 'डॉन 3' मध्ये डॉनची भूमिका पुन्हा साकारणार नाही यावर शिक्कामोर्तब झाला. रणवीर सिंग डॉनची भूमिका साकारणार आहे. पण आता 'किंग' सिनेमात शाहरुख पुन्हा एकदा ग्रे शेडची भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात शाहरुखची लेक सुहाना झळकणार आहे. शाहरुख - सुहाना या बापलेकीचा हा पहिलाच सिनेमा आहे. त्यामुळे व्हिडीओत दिसलेली स्क्रीप्ट पाहता शाहरुख आगामी 'किंग' सिनेमात दिसणार, हे निश्चित करायला हरकत नाही.

टॅग्स :शाहरुख खानसुहाना खान