Join us

'गंगूबाई काठियावाडी' फेम शंतनूचं बँक अकाऊंट हॅक, मोबाईल नंबर अन् ईमेल आयडीही बदलला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 12:59 PM

सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने हा धक्कादायक खुलासा केला आहे.

'गंगूबाई काठियावाडी' फेम अभिनेता शंतनू माहेश्वरीचे (Shantanu Maheshwari) बँक अकाऊंट हॅक झाले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने हा धक्कादायक खुलासा केला आहे. सतत होत असलेल्या हॅकिंगच्या घटनांचा तोही शिकार झाला आहे. त्याने संपूर्ण प्रकार इन्स्टाग्रामवर शेअर करत सर्वांना सतर्कही केले आहे. 

शंतनूने इन्स्टाग्रामवर लिहिले, 'विश्वासच बसत नाही. माझं अॅक्सिस बँक अकाऊंट हॅक झालं आहे. मला कल्पना नसताना माझ्या नावे एक कार्ड जनरेट करण्यात आलं. कोणताही OTP मला आला नाही. कोणतंही व्हेरिफिकेशन न करता माझा मोबाईल नंबर आणि ईमेलमध्ये बदल करण्यात आला. यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी.' यासोबत शंतनूने अॅक्सिस बँक, मुंबई पोलिस आणि सायबर पोलिसांना टॅग केले आहे.

फसवणूकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. आता तर थेट बँक अकाऊंट हॅक होऊन सरळ ईमेल आणि मोबाईल नंबरही बदलले जात आहेत. यावर वेळीच आळा बसवणं गरजेचं आहे. शंतनूसोबत घडलेली ही घटना धक्कादायक आहे. 

शंतनू टीव्ही विश्वातील मोठा चेहरा आहे. तसंच तो उत्तम डान्सरही आहे.रिएलिटी शो, वेब शो, मालिकांमध्ये त्याने काम केले आहे. शिवाय संजय लीला भन्साळी यांच्या 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमातही त्याने महत्वाची भूमिका साकारली. आपल्या साध्याभोळ्या चेहऱ्यामुळे त्याने सर्वांचं मन जिंकलं आहे. 

टॅग्स :धोकेबाजीसेलिब्रिटीबँक