अभिनेता शेखर सुमनच्या (Shekhar Suman) पत्नीचा भाऊ गेल्या अनेत दिवसांपासून गायब आहे. त्यामुळे शेखर सुमनचे कुटुंबीय चिंतेत आहेत. शेखर सुमनचे मेव्हणे डॉ संजय कुमार हे पटनामधून बेपत्ता झाले आहेत. गेल्या २२ दिवसांपासून त्यांचा काहीच पत्ता लागलेला नाही. अद्याप त्यांना शोधता का आले नाही म्हणत अभिनेत्याने पोलिसांना सवाल केला आहे.
अभिनेता शेखर सुमन म्हणाले, 'संजय कुमार खूपच साधे डॉक्टर होते त्यांचा कोणीही शत्रू नव्हता. कोणत्याही गोष्टीचं त्यांना टेन्शनही नव्हतं की ते आत्महत्या करतील. सीसीटीव्ही कॅमेरे नसणं हा सर्वात मोठा बेजबाबदारपणा याला कारणीभूत आहे. जर सीसीटीव्ही कॅमेरे असते तर ओव्हरब्रीजवर नेमकं काय झालं ते सगळं स्पष्ट झालं असतं.'
शेखर सुमन पुढे म्हणाले, 'मी आता मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहे. पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास करावा असं मी त्यांना सांगणार आहे. माझ्या मेव्हण्याचा शोध लवकरात लवकर घेण्यात यावा. जर पोलिसांना या प्रकरणी शोध लावता येत नसेल तर मी हात जो़डून विनंती करेन की हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावं.'
पतीच्या बेपत्ता होण्यामुळे शेखर सुमन यांच्या बहिणीची हालत नाजुक झाली आहे. शेखर सुमन म्हणाले, 'काल मी बहिणीला भेटलो तेव्हा ती मला बिलगून ढसाढसा रडली. माझ्या पतीला परत आणा असंच ती सतत म्हणत आहे. आज बिहार दिवस आहे, बिहार आधीसारखं राहिलेलं नाही. पण प्रशासन अजुनही कमजोर आहे. ते ठीक करण्याची गरज आहे.' हे सांगत असताना अभिनेते भावूक झाले. ते म