शिवम पाटील (Shivam Patil) हा छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शोंमधून नावारुपास आलेला मराठमोळा अभिनेता. तीन वर्षांपूर्वीचा ‘अय्यारी’ हा सिनेमा आठवत असेल तर त्यातला शिवमही तुम्हाला आठवेल. या सिनेमात शिवमने अगदी छोटीशी पण दमदार भूमिका साकारली होती. घायल-वन्स अगेन आणि कालाकांडी या सिनेमातही त्याने भूमिका गेल्या काही वर्षांपासून शिवम बॉलिवूडमध्ये पाय रोवण्याचे प्रयत्न करतोय. पण शिवमवर आरोप झालेत आणि सगळं काही संपल. होय, अभिनेत्री मेधा शंकर आणि अन्य दोन महिलांनी लावलेल्या आरोपांमुळे शिवमला काम मिळेनासे झाले. आता सोशल मीडियावर त्याने या सगळ्या आरोपांना उत्तर देत, आपबीती सांगितली आहे. या आरोपांमुळे नैराश्यात गेल्याचे त्याने म्हटले आहे.
तो लिहितो, मेधा सतत माझा अपमान करायची. माझ्या शरीरयष्टीवर विनोद करायची. तिने अनेकदा माझे मानसिक आणि शारिरीक शोषण केलेआहे. मी त्रस्त होतो. पण तिच्याबाबत मी कोणाकडे तक्रारही करु शकत नव्हतो. कारण मला माझे करिअर संपण्याची भीती वाटत होती. ती भीती मेधानच माझ्या मनात निर्माण केली होती. पण एकेदिवशी या त्रासातून मुक्त होण्याचा निर्णय मी घेतला. तिच्या पासून वेगळं झालो पण तरी देखील तिने त्रास देणे सोडले नाही.
मी आमच्या नात्याविषयी बाहेर कुठेही काही बोललो, तक्रार केली तर माझे करिअर संपवण्याची अप्रत्यक्ष धमकीच तिने मला दिली होती. गेली दोन वर्ष मी नैराश्येत होतो. आत्महत्या करण्याचा विचारही माझ्या मनात अनेकदा येऊन गेला. शिवमने या प्रकरणी मुंबई पोलिसांकडे कायदेशीररित्या तक्रार देखील दाखल केली आहे.