Join us

Video: गळ्यात रुमाल, टपोरी भाषा; 'गली बॉय' फेम अभिनेत्याने केली जग्गू दादाची नक्कल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2023 2:17 PM

'ए मावशी कॅमेरा इधर लेके आओ..'

बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ (Jackie Shroff)  म्हणजेच जग्गू दादा यांची एक वेगळीच स्टाईल आहे. चाळीत लहानाचे मोठे झालेले जॅकी दादा यांच्यातही अजूनही तो साधेपणा आहे. नुकतंच 'गली बॉय' फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने जग्गू दादाची नक्कल केली आहे. तो जॅकी श्रॉफ यांच्या स्टाईलमध्ये बोलताना दिसतोय. चाहत्यांना त्याचा हा व्हिडिओ भलताच आवडलाय.

व्हिडिओत सिद्धांत चतुर्वेदी मेकअप रुममध्ये बसला आहे. तो व्हिडिओग्राफरला जवळ बोलवतो आणि जॅकी दादाच्या स्टाईलमध्ये गळ्यात रुमाल बांधतो आणि म्हणतो, 'ए मावशी कॅमेरा इधर लेके आओ..मी काय म्हणतो लोक बोलतात की माझी स्टाईल एकदम जग्गू दादासारखी आहे. गळ्यात रुमाल, अंदर बंडी, टॉप टू बॉटम फुल चौकंडी. जग्गू दादा एकदम आपल्यासारखा आहे. कारण आम्ही एकाच गल्लीतून आलोय ना. बच्चा इधर आ...पौधा लगा पौधा...स्वत:साठी नाही मुलांच्या मुलांसाठी लाव. चल कट...'

सिद्धांतने जॅकी दादाची हुबेहुब कॉपी केली आहे आणि ती त्याला परफेक्ट जमलीही आहे. अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी 'एक नंबर' म्हणत त्याचं कौतुक केलं आहे. आता यालवर जॅकी दादा काही रिअॅक्शन देतात का यासाठी चाहते आतुर आहेत. 

सिद्धांत गेल्यावर्षी 'गहराईया','फोन भूत' या सिनेमांमध्ये दिसला. 'गली बॉय' सिनेमाने त्याला खरी ओळख दिली. शिवाय त्याचं आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाचं अफेअर सुरु असल्याच्याही चर्चा आहेत. दोघंही अनेकदा मूव्ही डेट, गोवा व्हॅकेशनला गेलेले दिसले आहेत.

टॅग्स :सिद्धांत चतुर्वेदीजॅकी श्रॉफबॉलिवूडसोशल व्हायरल