Join us  

निक जोनासने 6 वर्षांपूर्वी प्रियांका केलं होत प्रपोज, पहिल्यांदाच शेअर केला 'तो' खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 9:28 AM

निक जोनसने एक खास फोटो पोस्ट केला. ज्यानं सर्वांचं लक्ष वेधलं. 

बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि अमेरिकी सिंगर निक जोनस (Nick Jonas) यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांच्या केमिस्ट्रीची नेहमीच चर्चा रंगलेली असते.  नुकतंच प्रियंकाने आपला 42वा वाढदिवसा धुमधडाक्यात साजरा केला. प्रियंकाच्या वाढदिवशी पती निक जोनसने खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या होत्या.  यासोबत त्याने आणखी एक खास फोटो पोस्ट केला. ज्यानं सर्वांचं लक्ष वेधलं. 

निक जोनसने शेअर केलेला हा खास फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. कारण, तो असा तसा फोटो नाही. तर त्या दिवशीचा फोटो आहे, ज्यादिवशी निकने प्रियंकाला प्रपोज केलं होतं. निकने सहा वर्षांपूर्वी अर्थात २० जुलै २०१८ रोजी ग्रीसमध्ये प्रियंकाला लग्नाची मागणी घातली होती. नंतर अवघ्या सहा महिन्यात दोघांनी लग्न केलं. त्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये निकने प्रियंकाचा हात आपल्या हातात घेतल्याचं दिसून येत आहे. तर तिच्या हातात एक सुंदर अशी रिंग पाहायला मिळतेय. 

 निकने २० जुलै २०१८ रोजी काढलेला फोटो शेअर करत लिहलं, 'सहा वर्षांपूर्वी एका सुंदर आणि विस्मयकारक स्त्रीला मी लग्नासाठी विचारलं होतं. मला होकार दिल्याबद्दल धन्यवाद!' निकच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय. तर प्रियंकाच्या वाढदिवशीही तिचे काही फोटो निकने इन्स्टाग्रामवर शेअर केले. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्याने स्वत:ला भाग्यवान म्हटलं. "तू काय स्त्री आहेस...मी खूप भाग्यवान आहे. हॅपी बर्थडे माय लव्ह", असं कॅप्शन निक जोनसने दिलं. 

प्रियंका आणि निकने  डिसेंबर २०१८ मध्ये लग्न केलं. त्यानंतर जानेवारी २०२२ मध्ये या जोडप्याने सरोगसीद्वारे मुलगी मालतीचं स्वागत केलं. प्रियंकाचा पती पॉपस्टार निक जोनस हा गायक आणि अभिनेता देखील आहे. तो अनेक चित्रपटांमध्ये दिसला आहे. या दोघांच्या वयात १० वर्षांचे अंतर असून, प्रियंका ही निकपेक्षा वयाने मोठी आहे. प्रियंका आणि निकचा सुखाचा संसार सुरू असून ते कायम चाहत्यांना कपल गोल्स देताना दिसून येतात.

टॅग्स :प्रियंका चोप्रासेलिब्रिटीबॉलिवूडनिक जोनास