मुंबईतील अल्टामाऊंट रोडवर असलेल्या पृथ्वी अपार्टमेंट्सची इमारत सील करण्यात आली आहे. बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टी (Sunil Shetty) याचे घरही या इमारतीत आहे. कोरोनाच्या (Corona virus) वाढत्या रुग्णांमुळे ही इमारत सील करण्यात आली आहे. (Bollywood Actor Sunil Shetty's House In South Mumbai Sealed Due To Corona Cases)
नियमानुसार एखाद्या इमारतीत ५ किंवा पाच पेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडले तर ती सील करण्यात येते. सुनिल शेट्टी आणि त्यांचे कुटुंबीय सध्या मुंबईबाहेर आहेत. या बिल्डिंगमध्ये 30 मजले आणि 120 फ्लॅट्स आहेत. मुंबईच्या डी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे. पृथ्वी अपार्टमेंट सील करण्यात आली आहे. या भागात सध्या अशा १० इमारती सील आहेत. यामध्ये मलबार हिल्स आणि पेडर रोड वरील इमारतींचा देखील समावेश आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उंचावरील जागांवर 80 टक्के रुग्ण आढळले होते.
सुनिस शेट्टी यांच्याबाबत सांगायचे झाले तर ते सुरक्षित आहेत. त्यांच्या अधिकृत प्रवक्त्याने सांगितले की, सुनिल शेट्टी आणि त्यांचे कुटुंबीय हे सध्या मुंबई बाहेर आहेत. सुनिल शेट्टी हे या बिल्डिंगमध्ये राहतात. इमारतीत सापडलेल्या कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.
सावधगिरी म्हणून मुंबई महापालिकेने बिल्डिंगचे काही मजले सील केले आहेत. मुंबईत पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. काही काळापुरते ही संख्या कमी झाली होती. देशात महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांमध्ये कोरोनाने पुन्हा चिंता वाढविली आहे.