Join us

Sunny Kaushal ने Sharvari Wagh सोबत असलेल्या रिलेशनशीपबाबत केला खुलासा, म्हणाला....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 5:27 PM

सनी कौशलने कधीही शर्वरी वाघसोबतच्या नातं कन्फर्म केलेलं नाही. रिपोर्ट्सनुसार हे दोन्ही स्टार्स एकमेकांना डेट करत आहेत.

Sunny Kaushal On Rumoured Lady Love Sharvari Wagh : सनी कौशल  (Sunny Kaushal) नुकताच जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सोबत 'मिली'(Mili) चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. चित्रपटांव्यतिरिक्त सनी त्याच्या रिलेशनशिपच्या बातम्यांमुळेही चर्चेत आहे. बी-टाऊनमध्ये त्याच्या आणि अभिनेत्री शर्वरी वाघ(Sharvari Wagh) च्या अफेअरचे किस्से ऐकायला मिळतात, या नात्यावर दोघांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी आता सनी कौशलने एका मुलाखतीदरम्यान यावर आपलं मौन सोडलं आहे.

सनी कौशलने कधीही शर्वरी वाघसोबतच्या नातं कन्फर्म केलेलं नाही. रिपोर्ट्सनुसार  हे दोन्ही स्टार्स एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र स्पॉट झाले आहेत. news18.com ला दिलेल्या मुलाखतीत सनी म्हणाली, 'जेव्हा माझे वैयक्तिक आयुष्य हेडलाइनमध्ये येते तेव्हा मला काही फरक पडत नाही. शर्वरीलाही या गोष्टीचा फरक पडत नाही. आम्हा दोघांनाही चांगलं माहीत आहे की या फक्त बातम्यांचे मथळे आहेत. त्यांच्याकडे लक्ष देणारे आम्ही दोघेही नाहीत.. आम्ही या बातम्यांना गांभीर्याने घेत नाही.

सनी पुढे म्हणाली, 'शर्वरी पडद्यावर आणि खऱ्या आयुष्यातही दोनही ठिकाणी वेगळी आहे. ती चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींची काळजी घेते. आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. याशिवाय आमच्यात काहीही नाही.

जेव्हा सनी कौशलला त्याच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले की, विकी कौशलच्या लग्नानंतर तुझ्यावर असं काही दडपण आहे का? यावर तो म्हणाला, 'मी माझ्या आई-वडिलांना आधीच सांगितले आहे की, सध्या लग्नासाठी त्याच्याकडे पाहू नका. यासाठी माझ्याकडे अजून बराच वेळ आहे.

टॅग्स :सनी कौशलसेलिब्रिटीरिलेशनशिप