सध्या सगळीकडे वर्ल्डकपचा थरार पाहायला मिळत आहे. रविवारी (१९ नोव्हेंबर) वर्ल्ड कप २०२३चा अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडला धूळ चारलेल्या टीम इंडियाचा सामना फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. सामना सुरू होण्यासाठी अवघा अवधी शिल्लक आहे. बॉलिवूड सेलेब्सही या शानदार सामन्याचा आनंद घेण्यासाठी अहमदाबादला पोहोचले आहेत. आता अभिनेत्री उर्वशी रौतेलाही टीम इंडियाला चिअर करण्यासाठी अहमदाबादला पोहोचली.
न्यूज एजन्सी एएनआयने उर्वशी रौतेलाचा एक व्हिडीओ सोशल मीडिया हँडल X वर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये उर्वशी विमानतळावर असल्याचे दिसत आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना उर्वशी म्हणाली, 'मी खूप उत्साहित आहे. मला विश्वास आहे की भारत विश्वचषक ट्रॉफी जिंकेल'. शिवाय, तिला आवडता खेळाडू कोण असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, 'संपूर्ण टीम माझी फेव्हरेट आहे'.
यापूर्वी उर्वशी रौतेलाने १५ ऑक्टोबर २०२३ रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या भारत आणि पाकिस्तान विश्वचषक सामन्यात पोहचली होती. यावेली तिचा २४ कॅरेट सोन्याचा आयफोन हरवला होता. त्यानंतर पोलिसांमध्ये तिने तक्रार दाखल केली होती. उर्वशीचा हा 24 कॅरेट सोन्याचा iPhone 14 Pro Max होता. या फोनला खास ऑर्डर अंतर्गत डिझाइन करण्यात आले होते. उर्वशीच्या या फोनची किंमत तब्बल 7 लाख 55 हजार 430 रुपये असल्याचं समोर आलं होतं.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास उर्वशीने ‘सिंग साहब द ग्रेट’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. यामध्ये तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिनं ''सनम रे', 'ग्रेट गँड मस्ती', 'हेट स्टेरी 4' आणि 'पागलपंती' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यानंतर ती बॉलिवूड रॅपर हनी सिंगबरोबर लव्हडोस अल्बममध्ये दिसली होती, हे गाणं खूप प्रसिद्ध झाले होते. उर्वशी ही सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या आगामी चित्रपटांची माहिती ती सोशल मीडियावर माध्यमातून देते.