बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल हा गेल्या अनेक वर्षांपासून विविध सिनेमांमधून प्रेक्षकांचा फेव्हरेट अभिनेता आहे. विद्युत जामवाल सिनेमांमध्ये अंगावर काटा आणणारे स्टंट्स आणि अॅक्शन करताना दिसतो. विद्युत जामवाल अनेकदा चित्तथरारक स्टंट्स करताना दिसतो. प्रत्येक वेळी नवनवीन स्टंट्स पाहून विद्युतच्या चाहते नक्कीच थक्क होतात. अशातच विद्युतचा नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत विद्युत चेहऱ्यावर उकळतं मेण टाकताना दिसतोय.
विद्युतचा नवीन व्हिडीओ चर्चेत
एका व्हायरल व्हिडीओमध्ये विद्युत जामवाल स्टेजवर बसलेला दिसून येतो. मागे संगीत सुरु असलेलं ऐकायला मिळतं. पुढे अचानक विद्युत एक अशी गोष्ट करतो ज्यामुळे चाहत्यांचा आ वासतो. विद्युत समोर असलेल्या पेटत्या मेणबत्त्या उचलतो. पुढे या मेणबत्ती विद्युत चेहऱ्यासमोर आणतो. विद्युत डोळे बंद करतो आणि अचानक मेणबत्तीतलं उकळतं मेण त्याच्या चेहऱ्यावर पडतं. विद्युतचा हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून चाहते अभिनेत्याच्या धाडसाचं कौतुक करत आहेत.
विद्युतचं वर्कफ्रंट
विद्युत जामवालच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला विद्युतचा 'क्रॅक' सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. विद्युतच्या स्टंटचं कौतुक जरी झालंं असलं तरीही या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फारशी चमक दाखवू शकला नाही. ४५ कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमाने केवळ १७ कोटींचा व्यवसाय केला. हा सिनेमा विद्युतने स्वतः प्रोड्यूस केला होता. विद्युतच्या आगामी सिनेमाबद्दल अपडेट समोर नाही.