Join us  

Aindrila Sharma Funeral Video: अभिनेत्री अँड्रिला शर्माला बॉयफ्रेन्डने असा दिला अखेरचा निरोप, व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 6:25 PM

Aindrila Sharma Funeral Video: अँड्रिलाला दोनदा कॅन्सर झाला. या काळात सब्यासाचीने तिला भक्कम साथ दिली. त्यानंतरही तिच्या अखेरच्या क्षणातपर्यंत तो तिच्यासोबत होता...

Aindrila Sharma Funeral Video:  लोकप्रिय बंगाली अभिनेत्री अँड्रिला शर्मा (Aindrila Sharma) हिचं नुकतंच निधन झालं. 20 नोव्हेंबर 2022 रोजी  वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. दोनदा कॅन्सरला हरवणाऱ्या अँड्रिलाला ब्रेन स्ट्रोक आला आणि त्यानंतर  मल्टिपल कार्डियेक अरेस्टमुळे  तिचं निधन झालं. तिच्या निधनाने संपूर्ण बंगाली मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. तिचा प्रियकर सब्यासाची चौधरी याची अवस्था तर बघवत नाही. आपल्या लाडक्या प्रेयसीला निरोप देतानांचा त्याचा व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील.  

अँड्रिला आणि सब्यासाची गेल्या अनेक वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. अँड्रिलाला दोनदा कॅन्सर झाला. या काळात सब्यासाचीने तिला भक्कम साथ दिली. त्यानंतरही तिच्या अखेरच्या क्षणातपर्यंत तो तिच्यासोबत होता. अँड्रिलाच्या अंत्यसंस्कारावेळीचा सब्यासाची एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.   हा व्हिडिओ पाहून चाहतेही भावुक झाले आहेत.

 व्हिडिओमध्ये सब्यासाची अँड्रिलाच्या पायाशी बसलेला दिसतो आहे. तो बराच वेळ तिच्या पायाजवळ बसून राहतो. त्यानंतर तिच्या पाया पडतो आणि नंतर तिच्या पायांचं चुंबन घेतो. हा व्हिडीओ पाहून सगळेच हळहळले.  1 नोव्हेंबरलाअँड्रिलाला ब्रेन स्ट्रोकमुळे   कोलकातामधील रुग्णालयात भरती करण्यात आले होतं. यानंतर तिची प्रकृती आणखी बिघडली. अँड्रिलाने दोनदा कॅन्सरला हरवलं होतं. त्यामुळे यातूनही ती बरी होईल, असा सगळ्यांनाच विश्वास होता. पण कदाचित नियतीला ते मान्य नव्हत. 14 नोव्हेंबरला तिला मल्टिपल कार्डियेक अरेस्ट आला आणि तिचा श्वास कायमचा थांबला.  

अँड्रिलानं अनेक मालिकांमध्ये तसेच वेब सीरिजमध्ये काम केलं. तिनं 2007 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. झुमर या मालिकेमधून तिनं छोट्या पडद्यावर एन्ट्री केली. जिओं काठी,  जीवन ज्योती यांसारख्या मालिकांमध्ये तिनं काम केलं. तसेच तिनं वेब सीरिजमध्ये देखील काम केलं.

टॅग्स :सेलिब्रिटीमृत्यू