मनोरंजनविश्वात असे काही कलाकार आहेत ज्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व नाही. कोणी परदेशात जन्माला आलं आहे पण भारतातच लहानाचे मोठे झाले आहेत. त्यांच्या आई कडे किंवा वडिलांकडचे पूर्वज हे परदेशी आहेत. अशीच एक बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आणि कपूर परिवारातील सून जिचे पूर्वज चक्क जर्मनीचे आहेत. शिवाय तिच्या पणजोबांना त्याकाळी हिटलरविरोधात लिहिल्याने शिक्षाही झाली होती. कोण आहे ती अभिनेत्री?
ब्रिटनचं नागरिकत्व असलेली ही अभिनेत्री आहे आलिया भट (Alia Bhatt). होय, आलिया भटची आई सोनी राजदान या युकेमध्ये जन्माला आल्या. त्यांच्या आई या मूळच्या जर्मनीच्या आहेत. तिचे पणजोबा जे जर्मन होते आणि नाजीच्या विरोधात होते ते त्याकाळी हिटलरविरोधात अंडरग्राऊंड न्यूजपेपर चालवायचे. यामुळे ते पकडलेही गेले होते. त्यांना तुरुंगात टाकलं, टॉर्चर केलं. काही काळाने त्यांना तुरुंगातून बाहेर सोडलं पण देशातून बाहेर काढलं. मग शेवटी ते इंग्लंडमध्ये स्थायिक झाले. तिथे आलियाची आई सोनी राजदानचा जन्म झाला.
आलियाच्या आजी म्हणजे सोनी राजदानच्या आई आजही आहेत. त्यांचं वय ९५ आहे. आलिया अनेकदा त्यांच्यासोबत फोटोही शेअर करत असते. 'हायवे' सिनेमाच्या वेळी आलिया बर्लिनला गेली असता तिथे एका विद्यापीठात तिने आजोबांची ही गोष्ट सांगितली होती. तेव्हा सगळेच भावुक झाले होते. नंतर आल्यावर तिने आजीलाही हे सांगितलं तेव्हा तिची आजीलाही खूप भरुन आलं होतं. हा किस्सा आलियाने नुकताच एका मुलाखतीत सांगितला होता.