Join us

या अभिनेत्रीचे दोन वर्षांपूर्वी झाले लग्न, वर्षभरातच पतीपासून झाली विभक्त, आता घटस्फोटाची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 11:57 AM

कंगनाच्या ऑनस्क्रीन फ्रेन्डचे लग्न तुटण्याच्या मार्गावर...

ठळक मुद्देअमृताने चित्रपटांसोबतच टीव्ही शो व वेबसीरिजमध्येही काम केले आहे.

काई पो चे, आयशा आणि जजमेंटल है क्या यासारख्या चित्रपटांत दिसलेली अभिनेत्री अमृता पुरी हिच्या पर्सनल लाईफमध्ये सध्या फार काही ठीक नसल्याचे कळतेय. होय, 2017 मध्ये अमृताने लग्न केले. पण आता लग्नाच्या दोन वर्षांनंतर अमृता पतीपासून घटस्फोट घेण्याच्या तयारीत असल्याची बातमी आहे. पतीसोबतचे मतभेद आणि भांडणामुळे तिने हा निर्णय घेतल्याचे कळतेय. अमृता ही एचडीएफसी बँकेचे एमडी आदित्य पुरी यांची मुलगी आहे. अद्याप अमृताने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

नोव्हेंबर 2017 मध्ये अमृता पुरीने इमरून सोठीसोबत लग्नगाठ बांधली. इमरून हा मुंबईतील रेस्टॉरंटचा मालक आहे. बँकॉकमध्ये हा विवाह सोहभा पार पडला होता. शिख आणि हिंदू अशा दोन्ही पद्धतीने हा विवाह सोहळा झाला होता. पण लग्नाची नवनवलाई संपल्यानंतर पती-पत्नीत खटके उडू लागले. सूत्रांचे खरे मानाल तर हे वाद इतके विकोपाला पोहोचलेत की, आता अमृता घटस्फोट घेण्याच्या तयारीत आहे.

अलीकडे पतीच्या रेस्टॉरंट लॉन्चलाही अमृता गैरहजर होती. तिच्या पतीने नुकतेच टेर्टुलिया मुंबई नावाचे युरोपियन रेस्टारंट उघडले. याचा जंगी उद्घाटन सोहळा पार पडला. पण अमृता या सोहळ्याला हजर नव्हती. अमृताच्या एका जवळच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, नेहमीच्या भांडणांना कंटाळून अमृता वर्षभरापूर्वीच आपल्या माहेरी शिफ्ट झालीय.

दोघांच्या कुटुंबांनी अमृता व इमरून यांचे पॅचअप करण्याचे अनेक प्रयत्न केलेत. यानंतर काही काळासाठी दोघेही पुन्हा जवळ आलेत. पण थोड्याच दिवसांत त्यांच्यात पुन्हा मतभेद उफाळून आलेत. अखेर अमृता हे नाते संपवण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचली.

अमृताने चित्रपटांसोबतच टीव्ही शो व वेबसीरिजमध्येही काम केले आहे. जोया अख्तरच्या ‘मेड इन हेवन’ या वेबसीरिजमध्ये ती दिसली होती. याशिवाय अ‍ॅमेझॉन प्राईमवरच्या ‘फॉर मोर शॉर्ट्स’मध्येही ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसली होती. सध्या अमृताने कुठलाही नवा चित्रपट स्वीकारलेला नाही. नुकतीच सीएए व एनआरसीविरोधातील आंदोलनात ती दिसली होती.

टॅग्स :अमृता पुरी