कलाविश्वात सध्या लग्नसराईचे वारे वाहत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेता राजकुमार राव (rajkumar rao) आणि पत्रलेखा (patrlekhaa) यांनी लग्नगाठ बांधली. त्यांच्यानंतर आता कतरिना कैफ (katrina kaif) आणि विकी कौशल (vicky kaushal) यांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे या चर्चांमध्येच लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे (ankita lokhande) तिच्या लग्नाच्या तयारीला लागली असून नुकतीच तिची sprinters party झाली. या पार्टीतील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Sneh Zala या इन्स्टाग्राम पेजवर तिच्या sprinters partyचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. यात व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अंकिता एका जुन्या गाजलेल्या गाण्यावर डान्स करत आहे. मात्र, अचानकपणे मी सासरी जाणार नाही, असं ती म्हणते. त्यामुळे अवघ्या काही दिवसांवर लग्नाचा मुहूर्त येऊन ठेपला असतानाच अंकिता असं काय म्हणते हा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अंकिता जरी 'मैं ससुराल नहीं जाऊंगी', असं म्हणत असली तरीदेखील तिला लग्नाची प्रचंड ओढ लागली आहे. केवळ मज्जेचा एक भाग म्हणून ती सासरी जाणार नाही असं म्हणतांना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अंकिताने छान वेस्टर्न ड्रेस परिधान केला असून 'मैं ससुराल नहीं जाउंगी, डोली रख दो कहारों....', या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
दरम्यान, अंकिताच्या sprinters party मध्ये हिंदी आणि मराठी कलाविश्वातील अनेक अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे डिसेंबर महिन्यात अंकिता प्रियकर विकी जैनसोबत लग्न करणार आहे. अलिकडेच अंकिताने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. यात लग्नासाठी तिने खरेदी केलेल्या खास डिझायनर चप्पलांचा फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केला होता.