Join us  

शाहरुख खान सोबत रोमान्स करताना दिसली असती 'ही' मराठमोळी अभिनेत्री, पण एका क्षणात भंगले स्वप्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 8:56 AM

शाहरुख खान बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जातो.

शाहरुख खानबॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जातो. आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये शाहरुख खानचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं. त्याच्याबरोबर काम करण्याचं अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींबरोबरच नवोदित अभिनेत्रींचंही स्वप्न असतं. शाहरुखनंदेखील अनेक अभिनेत्रींना हिंदी सिनेसृष्टीत त्याच्या सिनेमांतून लाँच केलं. त्यामुळे त्याच्याबरोबर सिनेमात काम करायला मिळणं म्हणजे यशाचा हमाखास मार्ग आहे असं म्हटलं जातं. अशीच एक संधी मराठमोळ्या अभिनेत्रीला मिळाली होती. पण, नशिब पालटलं आणि क्षणात तिचं स्वप्न भंगलं.

 शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचा 2014 मध्ये रिलीज झालेला 'हॅप्पी न्यू इअर' हा चित्रपट आठवत असेल. या चित्रपटाची दिग्दर्शक फराह खान होती, पण दीपिका पदुकोण या चित्रपटासाठी पहिली पसंती नव्हती. दीपिकाच्या आधी एक मराठमोळी अभिनेत्री ही दिग्दर्शकाची पहिली पसंती होती. ती अभिनेत्री म्हणजे अंकिता लोंखडे.  पण काही कारणास्तव अंकिताच्या हातून हा सिनेमा निसटला आणि तो दीपिकाला मिळाला. नुकतंच अंकिताच्या एका मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती बॉलिवूडचे अनेक मोठे प्रोजेक्ट्स तिच्या हातातून कसे निसटत गेले, हे सांगताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ चांगलाचा व्हायरल झाला आहे. 

अंकिता 'बिग बॉस 17' मध्ये पाहायला मिळाली. टॉप 5 मध्ये स्थान मिळवलं होतं. पण, अंकिताला हा शो जिंकता आला नाही.  विजेत्याची ट्रॉफी मुनव्वर फारुकीकडे गेली. बिग बॉसनंतर आता अंकिता हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुड्डासोबत 'स्वातंत्र्य वीर सावरकर' सिनेमात झळकणार आहे.  येत्या 22 मार्च 2024 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.  

अंकितानं मणिकर्णिका सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. या सिनेमात तिनं झलकरीबाईची भूमिका साकारली होती. तर बागी 3 मध्ये तिनं रुची नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं खूप कौतुकही झालं. अंकितानं पवित्र रिश्ता या मालिकेतून बरीच प्रसिद्ध मिळवली होती. याच मालिकेतील तिचा को-स्टार सुशांत सिंह राजपूतसोबतचं ती रिलेशनशीपमध्ये होती. पण, दोघांचं ब्रेकअप झालं. यानंतर अंकितानं डिसेंबर 2021 मध्ये बिझनेसमन विकी जैनशी लग्न केलं.

टॅग्स :अंकिता लोखंडेसेलिब्रिटीबॉलिवूडशाहरुख खानसिनेमासुशांत सिंग रजपूत