२०१६ साली सलमान खानचा 'सुलतान' (Sultan) सिनेमा आला होता. कुस्ती आणि लव्हस्टोरी असा मेळ सिनेमात साधला होता. अनुष्का शर्मा सिनेमात लीड हिरोईन होती. दोघंही कुस्तीपटू दाखवले होते. सिनेमाची कथा, गाणी आणि कलाकारांचा अभिनय सगळंच प्रेक्षकांना आवडलं. सिनेमाने बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली. पण तुम्हाला माहितीये का अनुष्का शर्माच्या जागी आधी एका अभिनेत्रीने सिनेमासाठी १२ ऑडिशन दिल्या होत्या मात्र तरीही शेवटी तिला रिजेक्शनचा सामना करावा लागला होता. कोण आहे ती अभिनेत्री?
अनुष्का शर्माने 'सुलतान' सिनेमात केलेला अभिनय सर्वांना आवडला होता. मात्र सिनेमासाठी अभिनेत्री अनुप्रिया गोयंकानेही (Anupriya Goenka) ऑडिशन दिल्या होत्या. सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली,"मी सुलतान सिनेमात मुख्य भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. तेव्हा ते नवीन चेहऱ्याच्या शोधात होते. माझ्या ११-१२ वेळा स्क्रीन टेस्ट झाल्या. स्टेप बाय स्टेप प्रक्रिया सुरु होती. म्युझिक व्हिडिओ टेस्ट, मग कोरिओग्राफर वैभवीसोबत डान्स टेस्टही झाली. रीडिंग्समध्येही मी सामील होते. जवळपास १ महिना ते सुरु होतं. मजा आली. बरं झालं फक्त १ महिन्याचीच ती प्रक्रिया होती. जर ६-७ महिन्यांची असती तर मी डिप्रेशनमध्येच गेले असते."
ती पुढे म्हणाली, "मी अलीला भेटले नव्हते तोवर मला माहितच नव्हतं की मी सुलतानसाठी ऑडिशन देत आहे. YRF मध्ये तुम्हाला ओरिजनल स्क्रीप्ट दिली जात नाही. दुसऱ्याच स्क्रिप्टवरुन तुमचं ऑडिशन होतं. जेव्हा मला कळलं की ती ऑडिशन सुलतानसाठी होती तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं."
अनुप्रियाने याआधी yrf च्या दोन सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'वॉर' आणि 'टायगर जिंदा है' मध्ये ती दिसली. शिवाय 'आश्रम' वेबसीरिजमध्येही तिची भूमिका होती. ती शेवटची 'बर्लिन' सिनेमात दिसली.