‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून अनुष्काने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आणि त्यानंतर एकदाही मागे वळून पाहिले नाही. डिसेंबर २०१७ मध्ये अनुष्काने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली.
या सीक्रेट मॅरेजची तेव्हा बरीच चर्चा झाली होती. इटलीत अगदी खासगी समारंभात विराट व अनुष्का लग्नबंधनात अडकले. त्यामुळे त्यावेळी त्यांच्या लग्नाचे काही मोजकेच फोटो समोर आले होते. सुमारे चार वर्षं डेट केल्यावर दोघांनी लग्न केले होते. पण या रिलेशनशिपची कुणाला कल्पना देखील नव्हती. त्यामुळेच दोघांच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला, तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
अनुष्का आणि विराटची लव्हस्टोरी २०१३ मध्ये सुरू झाली होती. यशाच्या शिखरावर असलेल्या अनुष्का आणि विराटला एका कंपनीने जाहीरातीसाठी एकत्र कास्ट केले होते. असे म्हणतात की, दोघांची मैत्री इथूनच सुरू झाली. पुढे याच मैत्रीचे हळूहळू प्रेमात रुपांतर झाले. तेव्हापासून दोघांच्या प्रेमाचे किस्से रंगू लागले.
अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती झिरो चित्रपटात पहायला मिळाली. यात तिच्यासोबत शाहरूख खान व कतरिना कैफ मुख्य भूमिकेत होते. अनुष्का शर्माने 'पाताल लोक' वेबसिरीजची निर्मिती केली आहे. लवकरच ही वेबसिरीजची अॅमेझॉन प्राइमवर दाखल होणार आहे.