Join us  

​अभिनेत्री अवनी मोदीला आले चुका दुरुस्त करण्याचे मॅसेज!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2017 3:41 PM

सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने कार्यकर्त्यांसोबतच सरकारी कर्मचाºयांतही उत्साहाचे वातावरण असल्याचे दिसते. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी कार्यरत असलेल्या बीएमसीच्या ...

सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने कार्यकर्त्यांसोबतच सरकारी कर्मचाºयांतही उत्साहाचे वातावरण असल्याचे दिसते. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी कार्यरत असलेल्या बीएमसीच्या एका कर्मचाºयाकडून झालेल्या चुकीचा फटका मात्र अभिनेत्री अवनी मोदीला बसला आहे. बीएमसी कर्मचाºयाने चुकीचा नंबर छापल्याने अवनीला लोकांचे चुका दुरुस्त करण्यासाठी मॅसेज येऊ लागले आहेत. एका संकेत स्थळाने दिलेल्या माहितीनुसार, बीएमसीतर्फे एक जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहीरातीमध्ये मतदान ओळखपत्रात चुका दुरुस्तीसाठी एक मोबाईल नंबर देण्यात आला होता. मतदारांना आपल्या ओळखपत्रातील चूकां संदर्भात तक्रार करण्यासाठी या मोबाईल नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आले होते. मात्र, बीएमसीने प्रसिद्ध केलेल्या जाहीरातीमध्ये चुकून अभिनेत्री अवनी मोदीचा नंबर छापला गेला आणि त्यानंतर तिला हजारो फोन, मिस कॉल आणि मॅसेज तिला येऊ लागले. यामुळे तिला त्रास होत असल्याचे अवनीने  म्हटलं आहे. दरम्यान बीएमसीने चूक सुधारण्यासाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. बीएमसीद्वारे चुकून अभिनेत्री अवनीचा मोबाईल नंबर प्रसिद्ध करण्यात आला असून आता दुसरा नंबर देण्यात आला आहे. मात्र, या संपूर्ण प्रकारामुळे अवनी मोदीला प्रचंड त्रास झाला. त्यामुळे या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकाºयाने माफी मागावी असे अवनीने म्हटलं आहे. तर या प्रकरणी अतिरिक्त महापालिका आयुक्त संजय देशमुख यांनी एक दुसरी जाहिरात प्रसिद्ध करत चूक सुधरवली आहे. तसेच अवनी मोदी हिच्या नावाने एक दिलगिरी व्यक्त करणारं पत्रही पाठवण्यात आलं आहे. अभिनेत्री अवनी मोदी हिने मधुर भंडारकर यांच्या ‘कॅलेंडर’ या सिनेमातून आपलं करियर सुरू केले होते. अवनीने अनेक मराठी आणि गुजराती सिनेमांमध्ये काम केलं आहे.