Join us

 तुला लाज वाटली पाहिजे...! दीपिका पादुकोण पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 11:00 AM

दीपिका पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. होय, तिचा एक टिकटॉक व्हिडिओ याला कारण ठरला आहे.

ठळक मुद्देदीपिकाचा ‘छपाक’ हा सिनेमा रिलीज झाला आहे. हा सिनेमा अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल हिच्या आयुष्यावर बेतलेला आहे.

ऐन ‘छपाक’च्या रिलीजच्या तोंडावर दीपिका पादुकोण जेएनयूमधील आंदोलक विद्यार्थ्यांच्या भेटीला पोहोचली आणि खळबळ माजली. दीपिकाच्या या जेएनयू प्रेमानंतर ती प्रचंड ट्रोल झाली. अगदी तिच्या ‘छपाक’ या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची भाषाही अनेकांनी केली. आता दीपिका पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. होय,   तिचा एक टिकटॉक व्हिडिओ याला कारण ठरला आहे. दीपिकाने एक टिकटॉक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडीओत ती ‘छपाक’ या तिच्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. पण ज्या पद्धतीने तिने  हा टिकटॉक व्हिडिओ शूट केला त्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. टिकटॉक स्टार म्हणून ओळखल्या जाणा-या फाबीसोबत तिने हा व्हिडिओ बनवला आहे.

 

या व्हिडिओमध्ये दीपिका फाबीला तिच्या तीन आवडीच्या चित्रपटांमधील लुक्स रिक्रिएट करण्याचे चॅलेंज देताना दिसतेय. ‘ओम-शांती-ओम’ चित्रपटातील शांती, ‘पीकू’ चित्रपटातील पीकू आणि ‘छपाक’मधील मालती हे तीन लूक करण्याचे चॅलेज तिने दिले. फाबीनेही दीपिकाचे हे चॅलेंज स्वीकारत पुर्ण केले. मात्र हा व्हिडीओ दीपिकाच्या चाहत्यांना अजिबात आवडलेला नाही.

 

दीपिकाने ट्विटरवर हा टिकटॉक व्हिडिओ शेअर केल्यावर अनेकांनी यावरून तिला सुनावने. दीपिकाचा हा व्हिडिओ अत्यंत निंदणीय असल्याचे अनेकांनी म्हटले. फाबीला ‘छपाक’ चित्रपटातील मालती या भूमिकेचे लूक कॉपी करण्याचे चॅलेंज दिले जे फाबीने पुर्ण केले. पण दीपिकाने हे चॅलेंज द्यायला नको होते, असे म्हणत हा पब्लिसिटी स्टंट खूप वाईट होता अशा प्रतिक्रीया अनेकांनी दिल्या आहेत.

 

 

 

दीपिका एका अ‍ॅसिड हल्ल्यातील पिडितेवर चॅलेंज कसे काय देऊ शकते?असा सवाल अनेकांनी केला. अ‍ॅसिड हल्ल्यात पोळलेल्या शरीरावरचे जखमांचे वण्र असणे हा कुठलाही लूक असू शकत नाही, असे एका युजरने लिहिले. दीपिकाने केलेले हे आत्तापर्यंतचे सर्वात खराब प्रमोशन आहे, दीपिका तुला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत लोकांनी तिला धारेवर धरले.दीपिकाचा ‘छपाक’ हा सिनेमा रिलीज झाला आहे. हा सिनेमा अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल हिच्या आयुष्यावर बेतलेला आहे.

टॅग्स :दीपिका पादुकोण