Join us

एका बिग बजेट सिनेमातून दिशा पाटनीचा पत्ता कट, करिअरचे वाजणार तीन तेरा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 16:46 IST

एक यशस्वी अभिनेत्री म्हणून तिला अद्याप असा सिनेमा किंवा ओळख मिळालेली नाही.

फिल्मी करियरमध्ये एका सुपरहिट सिनेमाच्या प्रतिक्षेत असलेली अभिनेत्री दिशा पाटनीसाठी (Disha Patni) आगामी वर्ष महत्वाचं आहे. तिचे लवकरच 'कल्कि 2898 एडी','योद्धा' आणि 'कंगुआ' या तीन बिग बजेट सिनेमात ती झळकणार आहे. मात्र या चित्रपटांशिवाय ती आणखी एका बिग बजेट सिनेमात दिसणार होती ज्यातून तिचा पत्ता कट करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

दिशा पाटनीने 2015 साली अभिनेता वरुण तेजसोबत तेलुगू फिल्म 'लोफर'मधून पदार्पण केले. तर 'एम एस धोनी:अनटोल्ड स्टोरी' मधून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. याचदरम्यान टायगर श्रॉफसोबत तिचं अफेअर चर्चेत होतं. तेव्हापासून आजपर्यंत दिशाने 'बागी 2','भारत','मलंग','राधे' आणि 'एक व्हिलन रिटर्न्स' मध्ये काम केलं आहे. मात्र एक यशस्वी अभिनेत्री म्हणून तिला अद्याप असा सिनेमा किंवा ओळख मिळालेली नाही. आता दिशा आणि टायगर यांचंही ब्रेकअप झालं आहे. 

दिशाचा यंदा रिलीज होणारा 'योद्धा' सिनेमाही पोस्टपोन झाला आहे. तर कल्कि च्या रिलीजबाबत काहीच हालचाल दिसत नाहीय. ह सगळं असताना दिशाच्या हातातून मोठ्या बॅनरचा सिनेमा निसटला आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या 'कर्ण' सिनेमात दिशाला फायनल करण्यात आले होते. मात्र आता तिचा पत्ता कट करत राकेश मेहरा हे दाक्षिणात्य अभिनेत्री घेण्याच्या विचारात आहेत. यासाठी नयनताराच्या नावाची चर्चा आहे. 

टॅग्स :दिशा पाटनीबॉलिवूड