मनोरंजन क्षेत्रात काम करायचं म्हणलं की कोणत्याही अनुभवांना सामोरं जावं लागतं. तसंच अभिनेत्रींना त्यांचा लूक, फिटनेस यावर जास्त लक्ष द्यावं लागतं. नाहीतर त्यावरुनही त्यांना ट्रोलिंगला तर सामोरं जावंच लागतं. शिवाय यावर त्यांना मिळणाऱ्या कामाच्या ऑफर्सही अवलंबून असतात. याचं उदाहरण म्हणजे एका अभिनेत्रीला तू खूप बारीक दिसतेस म्हणत परत पाठवलं होतं. कोण आहे ती अभिनेत्री?
स्ट्रगल कोणालाच चुकलेला नाही. मनोरंजनक्षेत्रात तर नाहीच नाही. प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक म्हणजे दिव्या दत्ताने (Dicya Dutta) तिचा एक अनुभव शेअर केला आहे. लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत दिव्या म्हणाली, "तुम्हाला थेट रिजेक्ट केलं जातं. हळूहळू मला समजलं की सिनेमातून बाहेरही काढलं जातं. हे नेपोटिझमच असलं पाहिजे गरजेचं नाही. मला वाटतं हे फेवरेटिजम आहे. हे आऊटसाइडर्समध्येही आहे. फक्त फिल्म नाही तर दुसऱ्या क्षेत्रातही आहे."
ती पुढे म्हणाली, "जेव्हा मी एकही सिनेमा साईन केला नव्हता तेव्हा मी प्रत्येक ऑफिसमध्ये काम मागायला जायचे. सगळ्यांना भेट असंच मला सांगण्यात आलं होतं. तो मल्टिस्टारर सिनेमांचा काळ होता त्यामुळे बऱ्याच संधी होत्या. एक दिवस मी २२ चित्रपट साईन केले होते. २२ पैकी फक्त २ सिनेमांचं शूट सुरु झालं पण मला कास्ट केलंच नाही. माझ्या जागी दुसऱ्याच मुलीला घेण्यात आलं."
बारीक म्हणून सेटवरुन परत पाठवलं
दिव्या म्हणाली,"मी तेव्हा रिजेक्शन हा शब्दच ऐकला नव्हता. मला अनेक सिनेमांमधून बाहेर काढण्यात आलं. एकदा तर मी सेटवर पोहोचले पण मला परत पाठवण्यात आलं. मी खूप बारीक झालीये असं मला सांगण्यात आलं. आधी क्युट दिसत होतीस आता बारीक झालीस. त्यामुळे मला कळायचंच नाही की मी नक्की कसं असलं पाहिजे. मी जाड झाले पाहिजे की बारीक? मी खूप त्रासले होते. मी एक वस्तू असल्यासारखं मला वाटलं की जी आता तुम्हाला नकोय."
एकदा दिव्याला तिच्या आईने विचारलं की तू का रडत आहेस? तेव्हा मी तिला मला सिनेमातून काढल्याचं सांगितलं. जर मी शाहरुखसोबत काम केलं असतं तर मी आज स्टार असते. तेव्हा आई म्हणाली आज ज्यांनी तुला रिजेक्ट केलं एक दिवस हेच लोक तुझ्यासोबत काम करण्यासाठी येतील.