Join us

"तुझे प्रायव्हेट फोटो व्हायरल करेन", अभिनेत्रीला थेट स्वित्झर्लंडवरुन आला धमकीचा मेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 10:41 IST

अभिनेत्री एलनाज नोरौजीदेखाल सायबर क्राइमची शिकार झाली आहे. ईमेल बॉक्समधील एका मेलवर क्लिक करणं एलनाजला महागात पडलं आहे.

गेल्या काही दिवसांत सायबर क्राइमच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता 'सेक्रेड गेम्स फेम अभिनेत्री एलनाज नोरौजीदेखाल सायबर क्राइमची शिकार झाली आहे. ईमेल बॉक्समधील एका मेलवर क्लिक करणं एलनाजला महागात पडलं आहे. अभिनेत्री तातडीने याबाबत पोलिसांत तक्रार देत तिच्यासोबत घडलेला हा प्रकार चाहत्यांना सांगितला आहे. 

एलनाज नोरौजीने ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तिच्यासोबत घडलेला सायबर क्राइमचा प्रकार सांगितला आहे. एलनाज म्हणाली, "१८ जानेवारीला मला एक मेल आला होता. मी सहसा अशा मेलवर क्लिक करत नाही. पण, त्या मेलच्या सबजेक्टमध्ये माझा पासवर्ड होता. त्यामुळे मी तो मेल ओपन केला. त्या मेलमध्ये माझे प्रायव्हेट फोटो होते. त्यासोबत त्या मेलमध्ये एक मेसेजही होता. ज्यात लिहिलं होतं की माझ्याकडे तुझे फोटो आहेत. जर तुझे फोटो ऑनलाइन जायला नको असं तुला वाटत असेल तर लवकरात लवकर मला उत्तर दे. जर या मेलला रिप्लाय केला नाहीस तर पुढचा मेल तुझ्या प्रायव्हेट फोटोंच्या लिंकचा असेल. ज्यामध्ये तुझे फोटो ऑनलाइन गेलेले असतील". 

यानंतर एलनाज त्वरित सायबर क्राइम सेलशी संपर्क साधला. ज्या सर्व्हर वरुन हा मेल पाठवण्यात आला होता ते स्वित्झर्लंडमधला असल्याचं समोर आलं. त्या सर्व्हरवर युजरबाबत कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळे एलनाजला मेल कोणी पाठवला, हे कळू शकलेलं नाही. पण, सायबर टीमकडून हे अकाऊंट बंद करण्यात आलं आहे. पण, दुसऱ्या कोणत्या मेलवरुन पुन्हा मेल येण्याची एलनाजला भीती वाटत आहे. त्यामुळेच एलनाजने तिचे सगळे पासवर्ड बदलले आहेत. 

"मला आता सोशल मीडिया ओपन करायलाही भीती वाटते. मला असं वाटतं की त्याने माझे प्रायव्हेट फोटो व्हायरल केले असतील तर. मी बैचेन आहे. मला झोपही लागत नाही. मला थेरेपिस्टची मदत घ्यावी लागत आहे. असं वाटतं की कोणीतरी माझ्यावर नजर ठेवून आहे", असंही एलनाज म्हणाली.

टॅग्स :सेलिब्रिटीसायबर क्राइम