Join us

४० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अभिनेत्रीला पती व भावासह अटक!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2018 3:26 PM

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ४० लाख रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री सुरवीन चावला, तिचा पती अक्षय ठक्कर आणि ...

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ४० लाख रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री सुरवीन चावला, तिचा पती अक्षय ठक्कर आणि भाऊ मनविंदर सिंह यांना पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांवर तब्बल ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंजाबमधील व्यावसायिक सत्यपाल गुप्ता आणि त्यांचा मुलगा पंकजा गुप्ताने त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. तक्रारीत नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री सुरवीन, पती अक्षय आणि भाऊ मनविंदरने सत्यपाल आणि पंकजा गुप्ता यांच्याकडून ४० लाख रुपये घेतले होते. त्याचबरोबर हे पैसा दुप्पट करून देणार असल्याचे सांगितले होते. मात्र आजपर्यंत त्यांना त्यातील एक रुपयाही परत मिळाला नसल्याने या बाप-लेकांनी सुरवीनसह तिच्या पती आणि भावावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना आता अटक केली आहे. दरम्यान, पंकजा गुप्ता यांची सुरवीनच्या भावासोबत चांगली ओळख होती. त्यामुळेच तिने ‘नील बट्टे सन्नाटा’ या चित्रपटाला पैसे लावण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर ५० लाख रुपये गुंतविण्याचे ठरविण्यात आले. मात्र काही तांत्रिक कारणामुळे केवळ ४० लाख रुपयेच पंकजा यांना देऊ शकला. पैसे मिळावेत म्हणून स्वत: सुरवीनने पंकजाकडे पाठपुरावा केला होता. त्यासाठी ती तीनदा पंकजा यांना भेटली होती. सुरवीन एवढ्यावरच थांबली नाही तर तिने गुप्ता बाप-लेकांना आश्वासन दिले की, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आतच तुम्हाला ७० लाख परत करणार. पुढे सुरवीनचा हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगला व्यवसायही केला. मात्र अशातही सुरवीनने त्यांचे पैसे परत केले नाही. पंकजा आणि त्यांचे वडील हे सुरवीन आणि तिच्या पतीसोबत सातत्याने ई-मेलच्या माध्यमातून संपर्क साधत होते. मात्र त्यास त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर गुप्ता यांनी अकाउंट स्टेटमेंट मिळवून त्यावर ४० लाख रुपयांच्या व्यवहाराच्या नोंदी मिळविल्या. याआधारे त्यांनी पोलिसांत या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.