'मैं तेरा हीरो', 'बर्फी' 'रुस्तम', 'मुबारकां', 'बादशाहो' आणि 'रेड' यांसारख्या सिनेमातून लोकप्रिय बनलेली अभिनेत्री इलियाना गेल्या अनेक वर्षांपासून एका गंभीर आजाराचा सामना करते आहे. ती बॉडी डिस्मॉर्फिया नावाच्या आजाराने ती पीडित आहे. या आजारात शरीराचा शेप बिघडतो. ज्यामुळे शरीराचा आकार वेगळा दिसायला लागतो. इलियानाच्या कमरेखालचे शरीर थोडे मोठे आहे.ती ते सैल कपड्यांमध्ये लपवते.
या आजारामुळेच ती नैराश्यात गेली होती आणि तिने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता.काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरइलियानाचा एक फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. या फोटोत तिचे वाढलेले वजन दिसत होते. वाढलेल्या वजनामुळे सिनेमात दिसणारी सडपातळ इलियानाला अशा अवतारात ओळखणेही कठिण जात होते. त्यामुळे हा फोटो पाहताच अनेकांनी तिला ओळखलेच नाही. तिचा हा फोटो पाहून चाहतेही गोंधळले होते.
इलियानाने याविषयी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. यात तिने लिहीले होते की, मला नेहमी चिंता व्हायची की मी कशी दिसतेय. मला चिंता होते की माझे हिप्स खूप रुंद आहेत आणि कंबर लहान, पोट फ्लॉट नाही, नाक सरळ नाही, ओठ ठीक नाही. मला चिंता असायची की मी खूप उंच नाही आहे.
दिसायला फारशी सुंदर नाही, जास्त स्मार्ट नाही. इलियाना पुढे लिहिते, मला या गोष्टीची जाणीव नाही झाली की मी परफेक्ट होण्यासाठी नाही जन्मले. मी जागाच्या हिशोबाप्रमाणे स्वत:ला सुंदर बनवण्याचा प्रयत्न थांबवला आहे.
तेलगु इंडस्ट्रीतून आपल्या करिअरची सुरूवात करणा-या इलियानाने अलीकडे एका मुलाखतीत सुरूवातीच्या दिवसांच्या अनेक आठवणी शेअर केल्यात. यादरम्यान तिने साऊथ इंडस्ट्रीबद्दल अनेक खळबळजनक खुलासेही केले होते. साऊथ फिल्ममेकर्सला अभिनेत्रीच्या अभिनयात नाही तर पडद्यावर तिचा कमनीय देह दाखवण्यात अधिक रस असतो, असे इलियाना यावेळी म्हणाली. याबद्दलचा एक किस्साही तिने शेअर केला.
साऊथ मध्ये मी आले तेव्हा काय होतेयं, हेच मला कळायचे नाही. मला आजही माझा पहिला सीन आठवतो. पहिल्या सीनमध्ये माझ्या कमरेवर एक मोठे नारळ येऊन पडते, असे स्लो मोशनमध्ये दाखवले गेले. या सीनची गरज काय, असाच प्रश्न मला त्यावेळी पडला.
मी दिग्दर्शकाला विचारले तेव्हा, त्याने दिलेले उत्तर ऐकून मी बेशुद्धच पडायची बाकी होते. तुझी कंबर खूप आकर्षक आहे. ती कुणालाही वेड लावेल, हा सीन हिट होईल, असे त्या दिग्दर्शकाने मला निर्लज्जपणे सांगितले. तो सीन मी कसाबसा पूर्ण केला. पुढेही साऊथमध्ये माझ्या कमरेवर असे अनेक सीन्स केले गेलेत.
ते सीन देतानाची माझी स्थिती काय होती, ते माझे मलाच माहित. केवळ आणि केवळ पैशांसाठी मी असे सीन्स दिलेत. पण करिअरमधला सातवा सिनेमा करताना मात्र आता हे बस्स झाले, असे मला वाटले आणि पुढे मी अशा सीन्सला ठाम नकार द्यायला शिकले. यानंतरच मी बॉलिवूडकडे वळले, असे इलियानाने सांगितले.