Join us

बॉडी शेमिंगची झाली शिकार, लग्नाआधीच दिला मुलाला जन्म; बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 15:37 IST

सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्रीचा लहानपणीचा फोटो व्हायरल होतोय.

बॉलिवूडमध्ये काम मिळणं म्हणजे नशिबाचाच भाग आहे. या कलाकांचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा त्यांना ओळखणंही कठीण होतं. सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्रीचा लहानपणीचा फोटो व्हायरल होतोय. या अभिनेत्रीने अजय देवगण, अक्षय कुमार, वरुण धवन आणि शाहीद कपूर यांच्यासोबत काम केलं आहे. लग्नाआधीच आई झाल्याने ही अभिनेत्री सध्या चर्चेत आहे.

तर ही अभिनेत्री आहे इलियाना डिक्रुझ(Illeana D'cruz). मूळची पोर्तुगलची असलेली अभिनेत्री खूप कमी वेळात प्रसिद्ध झाली. 'बर्फी' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याआधी ती साऊथमध्ये काम करत होती. इलियानाला बर्फी सिनेमात खूप पसंत केले गेले. पुढे तिने अजय देवगण, अक्षय कुमार, वरुण धवनसोबतही स्क्रीन शेअर केली. इलियाना बराच काळ एका फॉरेनरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र त्यांचा ब्रेकअप झाला तेव्हा तिच्या ब्रेकअपची खूप चर्चा झाली. यानंतर तिचं नाव कॅटरिना कैफचा भाऊ सबास्टियन सोबत जोडलं गेलं. मात्र या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट झालं जेव्हा इलियानाने बाळाला जन्म दिला. अद्याप तिने बाळाच्या पित्याची सोशल मीडियावर ओळख करुन दिलेली नाही.

इलियानाने एकदा खुलासा करत सांगितलं की ती १२ वर्षांची असतानाच बॉडी शेमिंगची शिकार झाली आहे. इलियानाने कायम स्वत:ला फिट ठेवले. मात्र तिने सुद्धा ट्रोलिंग, बॉडीशेमिंगचा सामना केला ज्याचा तिला मानसिक त्रास झाला होता. सध्या इलियाना मुलाच्या पालनपोषणात मग्न आहे. मायकल डॉलन असं तिच्या बॉयफ्रेंडचं नाव असून लवकरच ते लग्न करणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच इलियानाने मुलाला जन्म दिला असून त्याचं नाव कोआ फीनिक्स डोलन असं ठेवण्यात आलंय.

टॅग्स :इलियाना डीक्रूजप्रेग्नंसी