Join us

फोटोतील चिमुकलीमुळे श्रीदेवी-माधुरीचाही झाला होता जळफळाट, दुर्दैवाने १९ व्या वर्षीच झालं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 17:38 IST

'3 इडियट्स' फेम अभिनेता शर्मन जोशीने मध्यंतरी हा फोटो अपलोड केला होता.

बॉलिवूडची ती सुंदर अभिनेत्री जिची आठवण आली की डोळे भरुन येतील. अगदी कमी वयात त्या अभिनेत्रीने इंडस्ट्रीत पदार्पण केलं आणि पहिल्याच सिनेमातून तिने सर्वांचं मन जिंकलं. सौंदर्याला साधेपणाची जोड असलेल्या या अभिनेत्रीच्या एन्ट्रीने श्रीदेवी, माधुरी या आघाडीच्या अभिनेत्रींचेही धाबे दणाणले होते. त्या अभिनेत्रीचा शाळेतील एक ग्रुप फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यामध्ये बॉलिवूडमधील इतरही काही अभिनेते, निर्माते आहेत.

'3 इडियट्स' फेम अभिनेता शर्मन जोशीने (Sharman Joshi) मध्यंतरी एक फोटो अपलोड केला होता. १९८४ सालच्या बॅचचा शाळेतला तो फोटो होता. यातील कित्येक जण फिल्म इंडस्ट्रीत आले असं त्याने कॅप्शन दिलं होतं. लाल रंगाच्या सर्कलने त्याने फोटो मार्क केले. तर या फोटोत अभिनेत्री दिव्या भारती, अभिनेता निर्माता फरहान अख्तर, रितेश सिधवानी, ऋषी रॉय, आनंद सुबाया यांचा समावेश आहे. मुंबईच्या मानेकजी कूपर एज्युकेशन ट्रस्टच्या सिलव्हर ज्युबिलीचा हा फोटो आहे.

या फोटोत चिमुकल्या दिव्या भारतीला (Divya Bharti) बघून चाहते भावूक झाले. कमेंट्समध्ये बहुतांश जणांनी दिव्या भारतीचा उल्लेख करत तिचीच आठवण काढली. केवळ १४ वर्षांची असताना दिव्या भारतीने फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. 'दीवाना' सिनेमामुळे तिला लोकप्रियता मिळाली. दुर्देवाने वयाच्या फक्त १९ व्या वर्षी तिचा बाल्कनीतून पडून  मृत्यू झाला. 

टॅग्स :दिव्या भारतीशरमन जोशीफरहान अख्तरव्हायरल फोटोज्सोशल मीडिया