Join us

दुसऱ्यांदा आईबाबा होणार हे गोड कपल? अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत दिली हिंट; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 13:14 IST

२०२३ मध्येच पहिला मुलगा झाला. आता दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे अभिनेत्री?

इशिता दत्ता (Ishita Dutta) आणि वत्सल सेठ (Vatsal Seth) हे बॉलिवूड आणि टीव्ही विश्वातील प्रसिद्ध रोमँटिक कपल आहे. वत्सल सेठने 'टार्जन: द वंडर कार' सिनेमात अजय देवगणच्या मुलाची भूमिका साकारली होती.  तर इशिता दत्ता 'दृश्यम' सिनेमात अजय देवगणच्याच लेकीच्या भूमिकेत दिसली. हे गोड कपल लवकरच पुन्हा आई बाबा होणार असल्याची चर्चा आहे. इशिताने 'व्हॅलेंटाईन डे'ला केलेल्या पोस्टमुळे ही चर्चा रंगू लागली आहे.

इशिता दत्ताने पती वत्सल सोबत क्युट फोटो शेअर केलेत. यामध्ये ती ऑफ शोल्डर लाल रंगाच्या गाऊनमध्ये खूप सुंदर दिसत आहे. तर वत्सल पांढरा शर्ट आणि ब्लॅक सूट बूटात एकदम डॅशिंग दिसतोय. एकमेकांसोबत रोमँटिक पोज देत त्यांनी फोटोशूट केलंय. या फोटोंसोबत इशिताने कॅप्शनमध्ये लिहिले, "९ वर्षांची ओळख, ८ वर्षांचं प्रेम आणि १ छोटं प्रेम आपण तयार केलं. आता लवकरच आपलं मन पुन्हा उजळणार आहे. एक व्हॅलेंटाईन पोस्ट तो बनता है."

३४ वर्षीय इशिताने ती दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याची हिंटच या पोस्टमधून दिली आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत विचारलं की, 'कुटुंबात नवा पाहुणा येणार आहे का?'. अद्याप इशिताने थेट काही खुलासा केलेला नाही.   इशिता आणि वत्सल २०१७ मध्ये लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर ६ वर्षांनी २०२३ साली जुलै महिन्यात इशिताने एका गोंडस मुलाला जन्म दिला. 

टॅग्स :टिव्ही कलाकारबॉलिवूडप्रेग्नंसीसोशल मीडियापरिवार