shita Dutta Pregnancy: आई होणं हा कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि आनंदाचा क्षण असतो. 'दृश्यम २' चित्रपटातील अजय देवगणची ऑनस्क्रिन लेक इशिता दत्ता रिअल लाईफमध्ये आई होणार आहे. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन फोटो शेअर केले आहेत. इशिता दत्ताने आपल्या प्रेग्नेंन्स दरम्यान केलेल्या फोटोशूटमधले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यात ती आपलं बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसतेय.
इशिता आपला पती वत्सल सेठसोबत बीचवर पोझ देताना दिसतेय. दोघांना मॅचिंग आऊटफिट घातलेले दिसतायेत. या स्टारकपलने फोटो शेअर करताना, ‘Baby on Board..’ असं कॅप्शन दिलं आहे. त्यांच्या चाहत्यांनी आणि सेलेब्सनी दोघांवर अभिनंदनचा वर्षाव केला आहे. आतापर्यंत या फोटोंना हजारो लाईक्स मिळाले आहेत.
इशिताने बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेता वत्सल सेठसोबत प्रेमविवाह केला होता. दोघांनी 2017 मध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केले होते. लग्नाला 6 वर्षे पूर्ण झाली असून हे कपल आई-वडील होणार आहेत. यामुळेच या बातमीने इशिता आणि वत्सल खूप खूश दिसत आहेत. इशिता ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तनुश्री दत्ताची बहीण आहे. जो 'दृश्यम' आणि 'दृश्यम 2' या दोन्हीमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. इशिता 'दृश्यम' चित्रपटात अजय देवगणच्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती.