भारत जोडो न्याय यात्रेची काल मुंबईत सांगता झाली. यानिमित्त इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या प्रमुखांची काल शिवाजी पार्कवर सभा झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि सर्वच नेत्यांनी विरोधी पक्षांवर सडकून टीका केली. या सभेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावेळी नाना पटोलेंनी भाकप नेते दीपांकर भट्टाचार्यांचा उल्लेख चुकून दीपांकर भ्रष्टाचार्य असा केला. या मुद्द्याला धरुन कंगना रणौतने निशाणा साधलाय.
कंगनाने नाना पटोले याशिवाय उद्धव ठाकरे - राहूल गांधी यांचा एक व्हिडीओ शेअर करुन लिहीलंय की, "भ्रष्टाचार्यजी. यार यांच्यासोबत इतकी नैसर्गिक कॉमेडी होते जसं काही एका सिनेमातील बावळट पात्राला कॉमेडीची स्क्रीप्ट लिहून दिली असेल." अशाा शब्दात कंगनाने उद्धव ठाकरे - राहूल गांधी यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
काल इंडिया आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरे, राहूल गांधी आणि इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांचा खरपुस समाचार घेतला केली. मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये ही सभा झाली. दुसरीकडे कंगना रणौतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, ती लवकरच 'इमर्जन्सी' सिनेमातून भेटीला येणार आहे. हा सिनेमा १४ जून २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.